police patil.jpg 
सोलापूर

कोरोना संकटात काम करणाऱ्या 28 गावच्या पोलिस पाटलांना कोविड योद्धा पुरस्कार 

अशफाक बागवान

बेगमपूर(सोलापूर) : कामती बु. (ता. मोहोळ) पोलिस ठाण्याच्यावतीने 28 गावातील पोलिस पाटील यांना कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले. 
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी उपस्थितीचे स्वागत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यापासून कामती पोलिस ठाण्यांतर्गत 28 गावातील पोलिस पाटील, पोलिस मित्र व कमांडो यांनी पोलिस प्रशासनाला केलेले सहकार्य, कोरोनाबाबत नागरिकांना सतर्क राहण्याच्या दृष्टीने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पोलिस ठाण्याच्यावतीने कोविड योध्दा म्हणून प्रमाणपत्र व श्रीफळ देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी शिंदे यांनी पोलिस पाटील हे पोलिस ठाणे व नागरीक यांच्यातील मुख्य दुवा असून त्यांच्या कार्याची पोच म्हणून व प्रेरणा देण्यासाठी हा गौरव करण्यात आला असल्याचे सांगितले. यावेळी कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे, पोलिस नाईक बबलू नाईकवाडी, हेड कॉन्स्टेबल अमोल नायकोडे, पोलिस शिपाई संदीप काळे, तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, सचिव नितीन उघडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शंकर पाटील, पोलिस पाटील नितीन फराटे, दत्तात्रय फडतरे, वसंत पाटील, म्हाळाप्पा पाटील, आरती माळी, उत्तम पाटील, अप्पासाहेब रासेराव आदींसह पोलिस पाटील, पोलिस मित्र उपस्थित होते. 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT