bank.jpg 
सोलापूर

निर्यातीसाठी 18 कोटी रुपयांचा होणार पतपुरवठा 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः यावर्षी जिल्ह्यात तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचा पतपुरवठा बॅंकांकडून केला जाणार आहे. शेती व उद्योगासोबत निर्यात उद्योगासाठी 18 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

जिल्हा अग्रणी बॅंकेने कोरोना संकटामुळे लांबलेला वार्षिक पतपुरवठा आराखडा निश्‍चित केला आहे. यावर्षी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी चार हजार 51 कोटी रुपये दिले जाणार आहेत. वर्षभरातील सर्व हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जे घेता येणार आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंकाकडून कर्ज पीक कर्ज वाटप सुरू आहे. शेती कामात भांडवली कर्ज दिले जाणार आहे. यासाठी पीक कर्जाशिवाय वेगळी तरतूद करण्यात आली आहे. एकूण दोन हजार 695 कोटी रुपयांची कर्जे वितरीत केली जातील. या दोन्ही कर्जाचे प्रकार मिळून एकूण सहा हजार 746 कोटी रुपये कर्जवाटप शेती क्षेत्राला केले जाणार आहे. 

जिल्ह्यातील लघू व मध्यम उद्योगासाठी एक हजार 916 कोटी रुपयांचे कर्ज दिले जाईल. निर्यात उद्योगासाठी 18 कोटी 45 लाख रुपयांचा पतपुरवठा होईल. शैक्षणिक कर्जासाठी एकूण 122 कोटी रुपयांचे वितरण गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कर्जरूपात केले जाणार आहे. सामाजिक उन्नती क्षेत्रासाठी 86 कोटींचा पतपुरवठा केला जाईल. वर्ष 2022 पर्यंत शेती उत्पादन दुप्पट करणे या उद्देशासाठी शेती व शेतीपूरक क्षेत्राला जास्त पतपुरवठा केला जाणार आहे. 
मागील वर्षात ग्रामीण जीवन्नोनती अभियान व मुद्रा योजनेत जिल्ह्यातील बॅंकांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नव्या उद्योजकांना उद्योगाच्या पतनिर्मितीसाठी मोठी मदत दिली जाणार आहे. कोरोना संकटानंतर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जाची मागणी जास्त होण्याची शक्‍यता आहे. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातचा तुरुंगातील मुक्काम वाढला ! न्यायालयाने सुनावली १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Kolhapur Tunnel Project : कोल्हापुरात भुयारी मार्ग होणार, शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत असणार भुयारी मार्ग

Call Scams : जर तुमच्या मोबाईलवर येत आहे सायलेंट फोन; तर सावध व्हा, नवा AI फ्रॉड करेल बँक खाते रिकामे, पाहा सुरक्षित कसे राहाल

"तो दारुडा, तुला सोडून देईल" प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईनेच केलेला लग्नाला विरोध; कोण आहे ही कलाकार ?

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

SCROLL FOR NEXT