gardi.jpg 
सोलापूर

किराणा, भाजी, फळे व औषधांच्या खरेदीसाठी तुडुंब गर्दी 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः शहरातील दहा दिवसांचा लॉकडाउन होणार असल्याने आज दिवसभरात गरजेच्या वस्तु घेण्यासाठी बाजारात नागरिकांची मोठी वर्दळ झाली होती. किराणा, औषधी व इतर गरजेच्या वस्तु घेण्यासाठी नागरिक बाजारात दाखल झालेले होते. सोलापूरचा लॉकडाऊन अवघ्या काही तासांवर आल्याने सहित्य खरेदीसाठी सकाळपासून नागरिक पिशव्या घेऊन घराबाहेर पडले होते. खरेदीसाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सचा नियम अक्षरश पायदळी तुडविलहा होता. 

किराणा दुकानामध्ये देखील ग्राहक खरेदीसाठी दाखल झाले होते. दहा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य व इतर किराणा सामान त्यांनी खरेदी केले. औषधाची दुकाने लॉकडाउनमध्ये सुरु राहणार असली तरीही जास्तीच्या औषधी खरेदीसाठी गर्दी होती. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या भाजी मंडईत भाज्या खरेदीसाठी नागरिक सकाळी लवकर आलेले होते. तेथे पोलिस व स्थानीक सामाजीक कार्यकर्त्यांनी नागरिकांना सोशल डिस्टन्स ठेवून खरेदीसाठी मदत केली. 

मोठ्या प्रमाणात वाहने घेऊन नागरिक बाजारात उतरल्याने सोशल डिस्टन्सचे तीन तेरा वाजले. बाजारातील गर्दी वाढत असताना फळांचे गाडे व इतर विक्रेत्यांनी देखील रस्त्यावरून गाडे फिरवून फळे व इतर वस्तुंची विक्री केली. किराणा दुकानात गर्दी मावत नसल्याने ग्राहकांना किराणा सामान घेण्यासाठी कितीतरी थांबावे लागले. या प्रकारात बाजारातील रस्त्यावर कुठेही सोशल डिस्टन्सचा नियम पाळला गेला नाही. लॉकडाउनमुळे पोलिसांना देखील आज गर्दी आवरणे कठीण झाले होते. वाहनचालकांनी भर रस्त्यावर दुकानांपर्यंत त्यांची वाहने नेल्याने या बेशिस्तीमध्ये भरच पडली होती. 

आज भाजी मंडी सुरु राहणार 
शुक्रवारी (ता.17) पासून होणाऱ्या लॉकडाउनसाठी नागरिकांना गुरुवार (ता.16) रोजी शहरातील सर्व भाजीमंडीमध्ये भाजी खरेदी करता येणार आहे. नियोजीत केलेल्या सर्व भाजी बाजारात सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीत भाजी विक्री केली जाणार आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात भाज्या उपलब्ध झाल्याने नागरिकांनी गर्दी करू नये. भाजी खरेदी करताना सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करावा असे आवाहन पोलिस आयुक्तालयाने केले आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT