Kharif crop loan disbursement increased by Rs 331 crore this year 
सोलापूर

खरीप कर्ज वाटपात डीसीसीचा 65 टक्के वाटा! 86 कोटींचे पीककर्ज वाटप

प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबणा झाल्याने ओढाताण होत आहे. त्यामुळे शेतकरी पीक कर्जाकडे वळल्याचे दिसते.

माळीनगर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने आजअखेर 85.93 कोटी रुपये पीककर्ज वाटप केले आहे. हे प्रमाण यावर्षीच्या खरिपातील कर्जवाटपाच्या उद्दिष्टपूर्तीच्या 65.23 टक्के इतके आहे. दरम्यान, बॅंकेने एप्रिलपासून शेतकऱ्यांना थेट कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. (DCC accounts for 65 per cent of kharif loan disbursements)

कोरोनामुळे वारंवार लॉकडाउनचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. व्यापारी भाव पाडून शेतमाल खरेदी करत आहेत. शेतकऱ्यांना नाइलाजाने आर्थिक नुकसान सोसून तो विकावा लागत आहे. परिणामी शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबणा झाल्याने ओढाताण होत आहे. त्यामुळे शेतकरी पीक कर्जाकडे वळल्याचे दिसते.

गतवर्षी जिल्हा बॅंकेने या तारखेपर्यंत सहा हजार 31 शेतकऱ्यांना 57.22 कोटी रुपये कर्जवाटप केले होते. यावर्षीही शेतकरी कर्ज घेण्यासाठी पुढे सरसावले असल्याचे चित्र आहे. जिल्हा बॅंकेने यावर्षी 11 हजार 675 शेतकऱ्यांना 10 हजार 741 हेक्‍टर क्षेत्रासाठी 21 मेअखेर 85.93 कोटी रुपये पीककर्ज वाटप केले आहे. गतवर्षीच्या या कालावधीतील कर्जवाटपाच्या तुलनेत ते 28.71 कोटी रुपयांनी अधिक आहे. यंदा कर्जाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पाच हजार 644 ने जास्त आहे. यावर्षी जिल्हा बॅंकेला खरीपासाठी 131.73 कोटी रुपये व रब्बीसाठी 244.49 कोटी रुपये मिळून 376.22 कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

गतवर्षी रब्बीपासून खऱ्या अर्थाने जिल्हा बॅंकेने कर्ज वाटपास सुरुवात केली आहे. त्याअगोदर बॅंक अडचणीत होती. परिणामी निधीची अडचण होती. त्यामुळे सहा-सात वर्षांपासून पीककर्ज वाटप बंद होते. मागील वर्षी ऑक्‍टोबरपासून बॅंकेने कर्जवाटप सुरू केले. कर्जवाटप करताना बॅंकेने काही निकष लावले. त्यानुसार बॅंक पातळीवर 100 टक्के तर संस्था पातळीवर 50 टक्के वसुली असलेल्या संस्था कर्ज वाटपासाठी पात्र ठरविण्यात आल्या. त्याप्रमाणे मागच्या जूनअखेर 334 संस्था त्यासाठी पात्र होत्या. आता पात्र संस्थांची संख्या 21 ने वाढून 355 झाली आहे. येत्या जूनअखेर आणखी 30 ते 40 संस्था पात्र होतील, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. नाबार्डकडून निधी घेऊन ऑक्‍टोबरपासून एक लाख रुपयांपर्यंत कर्ज वाटपाचा निर्णय बॅंकेने घेतला होता. दोन-तीन महिन्यानंतर निधीची उपलब्धता विचारात घेऊन शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्जवाटप सुरु केले. गतवर्षी रब्बीतील कर्जवाटपाचे 87 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. अनेक शेतकरी राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून थेटपणे कर्ज घेतात. जिल्हा बॅंकेने ही योजना सुरू केल्याने शेतकरी त्याचा लाभ घेतील, असा विश्वास प्रशासकांनी व्यक्त केला.

चालू वर्षी खरीप व रब्बीच्या कर्जवाटपाचे सर्व उद्दिष्ट निश्‍चितच पूर्ण होईल. पात्र संस्थांमधील एकही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही. बॅंकेने एप्रिलपासून शेतकऱ्यांना थेट कर्जपुरवठा सुरु केला आहे. त्यासाठी तारण आवश्‍यक आहे.

- शैलेश कोतमिरे, प्रशासक, जिल्हा बॅंक, सोलापूर

आकडे बोलतात

2020-21 मधील लक्षांक

खरीप पीककर्ज उद्दिष्ट - 131.73 कोटी रुपये

रब्बी पीककर्ज उद्दिष्ट - 244.49 कोटी रुपये

एकूण कर्जवाटप उद्दिष्ट - 376.22 कोटी रुपये

21 मेपर्यंतचे कर्जवाटप - 85.93 कोटी रुपये

कर्जवाटपाची टक्केवारी - 65.23 टक्के

लाभार्थी - 11675

कर्ज दिलेले क्षेत्र - 10741 हेक्‍टर

(DCC accounts for 65 per cent of kharif loan disbursements)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT