Jayasiddheshwar-Mahaswamy- 
सोलापूर

खासदार डॉ. महास्वामींच्या 'अटकपूर्व'वर आज फैसला 

तात्या लांडगे

सोलापूर : भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्रप्रकरणी सदर बझार पोलिसांत कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भितीने डॉ. महास्वामी यांनी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यावर डॉ. महास्वामींचे वकील व सरकार पक्षाचा युक्‍तीवाद पूर्ण झाला. उद्या (ता. 21) त्यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे. 


सोलापूर जात पडताळणी समितीने खासदार डॉ. यांनी लोकसभा निवडणुकीवेळी जोडलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला आहे. या निर्णयाविरुध्द डॉ. महास्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर उच्च न्यायालयाने डॉ. महास्वामींना 8 एप्रिलपर्यंत दिलासा दिला असून त्यांच्या बनावट जात प्रमाणपत्राबद्दल फेरपडताळणी होईल, असा विश्‍वास त्यांच्या वकिलांनी व्यक्‍त केला. मात्र, तत्पूर्वी अक्‍कलकोट तहसिलदारांच्या फिर्यादीनुसार सोलापूर न्यायालयाच्या आदेशानुसार सदर बझार पोलिसांत कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागितले होते. त्यावर सकृतदर्शनी डॉ. महास्वामी यांनी गुन्हा केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देवू नये, अशी विनंती सरकारी वकील डॉ. प्रदिपसिंग रजपूत यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यावर शुक्रवारी (ता. 20) जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्‍तीवाद पूर्ण झाला असून आता त्यावर उद्या (शनिवारी) अंतिम निर्णय होईल, असे सरकारी वकिलांनी सांगितले. 


डॉ. महास्वामींच्या वकिलांचे म्हणणे... 

  • जात प्रमाणपत्र कायदा 2002 रोजी अस्तित्त्वात आला असून महास्वामींचे प्रमाणपत्र 1982 चे आहे 
  • कायदा अस्तित्त्वात येण्यापूर्वीच्या घटनेवर खटला दाखल होणे कायद्याविरुध्द आहे 
  • बनावट जात प्रमाणपत्राची फिर्याद देण्यासाठी सरकारची परवानगी आवश्‍यक असतानाही ती घेतली गेली नाही 
  • जात प्रमाणपत्राचा फौजदारी खटला न्यायालयात दाखल करुन समरी ट्रायल बेसवर चालावा 
  • जात प्रमाणपत्रासंदर्भातील सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे निवाडे केले सादर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT