The Dikshabhoomi Express will start running via Latur.jpg 
सोलापूर

'दिक्षाभूमी एक्स्प्रेस' आता लातूरमार्गे; अनेक दिवसांपासूनची मागणी आता मार्गावर

विजय थोरात

सोलापूर : गाडी क्रमांक 01045 व 01046 दिक्षाभूमी एक्सप्रेस ही महाराष्ट्र आणि उत्तर भारताला जोडणारी महत्त्वाची रेल्वे आहे. अनेक दिवसापासून ही रेल्वे लातूर मार्गे वळवावी अशी मागणी होत होती. या मागणीला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी अखेर लातुरमार्गे धावण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे लातूरमधील भाविकांची व प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. येत्या शिवजंयतीपासून ही रेल्वे लातूर मार्गे धावायला सुरूवात होईल. 

अनेक वर्षापासून सातारा, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेडमार्गे धावत होती. या मार्गानुसार कोल्हापूर ते नागपूर हे अंतर ४०८ कि.मी लावून जावे लागत होते. यामुळे प्रवासाला १२-१५ तासांचा अधिक वेळ लागत होता. यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्ययही होत होता. तसेच लातूर येथून उत्तर भारतात जाण्यासाठी एकही रेल्वे नव्हती. या सर्व बाबी लक्षात घेऊन मध्य रेल्वे सोलापूर मंडळाचे सल्लागार समिती सदस्य श्यामसुदंर मानधना यांनी ही रेल्वे लातूरमार्गे वळवावी अशी मागणी केली. तसेच औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिक्षाभूमी एक्सप्रेस लातूरमार्गे वळवावी अशी मागणी केली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी ही बाब रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांना पत्राद्वारे केली होती. येत्या शिवजयंतीपासून म्हणजे 19 फेब्रुवारी पासून ही रेल्वे लातूर पासून धावणार आहे. या रेल्वेमुळे कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, परळी वैजनाथ, वाराणसी, बौद्ध विहार अशा अनेक तिर्थस्थळांना तसेच शहरांना जाण्यासाठी सोय झाली आहे.

दिक्षाभूमी एक्सप्रेस सोलापूर विभागातून धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. येत्या 19 फेब्रुवारी पासून दिक्षाभूमी एक्सप्रेस सुरू होणार आहे.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates :बीड अहिल्यानगर रेल्वे धावली

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

Weather Alert IMD : हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT