akkalkot bajar.jpg
akkalkot bajar.jpg 
सोलापूर

अक्कलकोटच्या भाजी मंडीत मास्क न वापरण्याची बेशिस्त : पोलिसांचे पालिकेला पत्र 

राजशेखर चौधरी

अक्कलकोट(सोलापूर) : अक्कलकोट शहरात आणि तालुक्‍याच्या ग्रामीण हद्दीत कोरोना आजार आणखी वाढू नये व त्याला वेळीच आळा बसायला हवे यासाठी आरोग्य विभागाने जारी केलेले नियम आणखी कडक करण्याची गरज आहे. 

कालपासून अक्कलकोट शहरातील चौकात मास्क नसलेल्या लोकांची तपासणी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे सुरू असल्याने तेवढयापुरते मास्क वापरायचे आणि पुन्हा काढायचे असा प्रकार सर्रास सुरू आहे. 

नागरिक स्वतःचा बचाव कोरोनापासून करून घेण्यासाठी नियम पाळत नसल्याने प्रशासनाला कारवाई करणे भाग पडत आहे. स्वतःच सजग राहून सुरक्षा नियम पाळले तर कोरोनाला दूर ठेऊ शकतो याची जाणीव पदोपदी करून द्यावे लागत आहे. त्याचबरोबर अक्कलकोट शहरात फत्तेसिंह क्रीडांगणाच्या बाजूला भाजी मंडई सुरू असून फक्त छोटा रस्ता असूनही दोन्ही बाजूस दाटीवाटीने विक्रेते बसतात. त्यांच्यात सुरक्षित अंतर नाही, तोंडावर मास्क नाही, सॅनिटाइझरचा तर पत्ताच नाही. या गर्दीतही दुचाकीधारक आपले वाहन घेऊन येत असतात त्यामुळे ही जागा जास्त धोकादायक दिसत आहे. 
नगरपरिषदने याची पाहणी करून या भाजी मंडईत विक्रेते व ग्राहकांना शिस्त लावणे गरजेचे आहे. शहरात दुकाने उशिरा पर्यंत सुरू ठेवणे, रस्त्यावर व्यापार करणाऱ्यांना स्वच्छता पाळावयास लावणे, रस्त्यावर इतस्ततः थुंकणाऱ्यांना प्रतिबंध करणे, अंतर पाळावयास लावणे, मास्क व सॅनिटायझर वापराकडे लक्ष देणे आदी उपाय करावे लागणार आहेत. 

सर्वांनी काळजी घेणे महत्वाचे 
अक्कलकोट शहरात सध्या मास्क न वापरणे, गाडीवर तीघांनी बसणे व संध्याकाळी सात नंतर दुकाने उघडणे यावर कारवाई सुरू आहे. नगरषरिषदेस सुद्धा यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे. सर्वांनी जबाबदारीने व काळजीने वागणे आवश्‍यक आहे 
- कलप्पा पुजारी,पोलिस निरीक्षक उत्तर ठाणे

संपादनः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT