indian railway 
सोलापूर

मोठी बातमी ! रेल्वेकडून सवलतीचा प्रवास बंद 

तात्या लांडगे

सोलापूर : देशातील कोरोनाला हद्दपार करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आतापर्यंत 40 हून अधिक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. आता दिव्यांग प्रवासी, रुग्ण आणि विद्यार्थी वगळता अन्य प्रवाशांचा सवलतीचा प्रवास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्‍ती, स्वातंत्र्य सैनिक, युथ, शेतकरी, कलाकार, राष्ट्रीय खेळाडू, डॉक्‍टर्स, मासिक पासधारक आणि सहल, सभा व कार्यशाळांसाठी जाणाऱ्या व्यक्‍तींचा समावेश आहे. दुसरीकडे प्रवासी नसल्याने रविवारी (ता. 22) लालपरीची सेवा बंद ठेवली जाणार आहे. 


कोरोनाचा प्रसार वाढू नये या हेतूने आता 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, राष्ट्रपती पदकप्राप्त पोलिस अधिकारी, कर्मचारी, पंतप्रधानांकडून पुरस्कारप्राप्त उद्योजक, शिक्षक, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्‍ती, स्वातंत्र सैनिक, शैक्षणिक सहली, राष्ट्रीय कार्यशाळा, सभा, मानव उत्थान सेवा समिती, राष्ट्रीय युथ प्रोजेक्‍ट, भारत स्क्‍वॉट गाईडस्‌, शेतकरी आणि दूध उत्पादक, भारत कृषक समाज, सर्वोदय समाज, वर्धा, कलाकार, राष्ट्रीय खेळाडू, डॉक्‍टर्स, नर्स, भारत सेवा दल, बेंगलोर यासह अन्य संस्था व व्यक्‍तींचा सवलतीचा प्रवास रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. 20) रेल्वे मंत्रालयाने हैदराबाद- मुंबई-हैदराबाद, हैदराबाद-पुणे-हैदराबाद आणि नांदेड-पुणे-नांदेड एक्‍स्प्रेस रद्द केल्या आहेत. 

ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र सैनिक, कलाकार, खेळाडूंचा सवलतीचा प्रवास बंद 
देशातील कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने विद्यार्थी, दिव्यांग प्रवासी व रुग्ण वगळता अन्य प्रवाशांचा सवलतीचा प्रवास बंद केला आहे. रविवारी (ता. 22) जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार असून त्यादिवशी रद्द केलेल्या एक्‍स्प्रेस रेल्वे वगळता अन्य गाड्या नियोजित वेळेनुसार धावतील. 
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे 


राज्यातील लालपरी रविवारी राहणार बंद 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 22) देशभर जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासीच नसतील तर एसटी बस कशा चालणार, असा प्रश्‍न महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासमोर उपस्थित झाला. या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्‍यक कामांसाठी ज्या ठिकाणी समाधानकारक प्रवासी असतील ते मार्ग वगळता अन्य मार्गांवरील बससेवा बंद राहील, असे महामंडळाचे परिवहन व्यवस्थापक राहूल तोरो यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: निवृत्तीच्या वनडेत एलिसा हेलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, स्मृती मानधनाचा विक्रमही मोडला; ऑस्ट्रेलियाचा भारताला व्हाईटवॉश

Navi Mumbai: ऐरोलीत ‘नो पार्किंग’ फलक नाममात्र! रुग्णालयाबाहेर बेकायदा पार्किंग; रुग्ण, पादचारी आणि वाहतुकीला अडथळा

Holika Dahan 2026: यंदा पहिल्यांदाच होळीची पूजा करताय? जाणून घ्या होलिका दहनाची विधिवत आणि योग्य पद्धत

Latest Marathi News Update : महिन्याभरात राज्यातील सगळ्या कार्यालयांचे पॉश ऑडिट करण्याचे महिला आयोगाचे निर्देश

Accidental Death: शेतकऱ्याचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू; बार्शी तालुक्यातील धक्कादायक घटना, शेतात जनावरे घेऊन गेले अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT