IMG-20200407-WA0194 (1).jpg
IMG-20200407-WA0194 (1).jpg 
सोलापूर

नोटाबंदी झाली काय ! लॉकडाउनमध्येही निराधारांच्या बॅंकांबाहेर रांगा 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभर लॉकडाउन जाहीर झाला असून त्यात आणखी वाढ होईल, अशा चर्चेने सर्वसामान्य खातेदार पाचशे व हजार रुपये काढून घेण्यासाठी बॅंकांबाहेर गर्दी करु लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असतानाही या नियमाला बगल देत बॅंकांबाहेरील खातेदारांच्या रांगा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नोटाबंदी झाली की काय, अशी चर्चा नागरिक करु लागले आहेत. 

कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने देशावरील कोरोनाचे संकट दूर होण्याच्यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारकडून दिवसेंदिवस कडक उपाययोजना केल्या जात आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिस कारवाई करीत असून सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत 21 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे आठ हजारांहून अधिक जणांविरुध्द गुन्हे सोलापूर शहरात दाखल झाले आहेत. किराणा दुकानात अथवा भाजी खरेदी करताना सोशल डिस्टन्सचे पालन करावे, अशा सक्‍त सूचनाही दिल्या जात आहेत. मात्र, बॅंकांबाहेर सोशल डिस्टन्सचा नागरिकांना विसर पडल्याचे चित्र असून शिव भोजनाच्या ठिकाणीही अशीच स्थिती पहायला मिळत आहे. काही बॅंकांनी खातेदारांमध्ये तीन फुटाचे अंतर असावे म्हणून पांढरे पट्टेही मारले, परंतु नागरिकांना ना नियमांची ना कोरोची भिती वाटते अशीच स्थिती आहे. 


डिजिटल इंडियाची योजना कागदावरच 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतर डिजिटल इंडियाची घोषणा करीत सर्वच व्यवहार ऑनलाइन व्हावेत यासाठी कॅशलेस इंडिया, डिजिटल इंडियाची घोषणा केली. तत्पूर्वी, नोटाबंदी केल्यानंतर जुने पैसे बॅंकेत जमा करण्यासाठी बॅंकांबाहेर लांबलचक रांगा लागल्याचे पहायला मिळाले. निराधार योजनेतील लाभार्थी, गॅस सिलेंडरची सबसिडी, जनधन योजनेचे लाभार्थी पाचशे ते एक हजार रुपयांची रक्‍कम काढून घेण्यासाठी बॅंकांबाहेर गर्दी करु लागले आहेत. दुसरीकडे मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा बॅंकांसह खातेदारांना विसर पडल्याचेही दिसत आहे. 


पांढरे पट्टे मारण्यासाठी मिळेना पेंटर 
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनचे खातेदारांनी तंतोतंत पालन करावे, यासाठी सर्वच बॅंकांना सोशल डिस्टन्सिंगचे उपाय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार बहूतांश बॅंकांनी उपाययोजना केल्या असून आता बॅंकांबाहेर कायमस्वरुपी तीन फुटाच्या अंतरावर पांढरे पट्टे मारण्यासाठी पेंटरचा शोध सुरु आहे. निराधार योजनेतील लाभार्थी, गॅस सिलेंडर सबसिटी, जनधन योजनेतील लाभार्थी पैसे काढण्यासाठी गर्दी करु लागले आहेत. 
- संतोष सोनवणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर 


ठळक बाबी... 

  • रंगभवन परिसरातील बॅंकासमोर खातेदारांची बॅंकांबाहेर पैसे काढण्यासाठी झुंबड 
  • केगाव (ता. उत्तर सोलापूर) सेंट्रल बॅंकेसमोर खातेदारांची होतेय अलोट गर्दी 
  • बॅंकांची स्वत:ची जागा अपुरी पडत असल्याने खातेदारांची गर्दी झाली रस्त्यांवरच 
  • बॅंक अधिकाऱ्यांनी नियुक्‍त केले अतिरिक्‍त कर्मचारी : खात्यांवरील रकमेची माहिती रांगेत दिली जातेय 
  • लॉकडाउन वाढेल या भितीने निराधार पाचशे ते एक हजारांची रक्‍कम काढण्यासाठी सकाळपासूनच लावत आहेत रांग 
  • लॉकडाउन अन्‌ संचारबंदीतही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 
  • बॅंकांसमोरील गर्दी हटविताना अधिकारी वैतागले : खातेदारांकडून होईना सोशल डिस्टन्सचे पालन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT