apang din.jpg 
सोलापूर

सत्तर दिव्यांगांना ब्लॅंकेटचे वाटप व कोविड योद्ध्यांचा सत्कार

शांतीलाल काशीद

मळेगाव (सोलापूर) ः स्वप्नपूर्ती सकल दिव्यांग बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने बार्शी तालुक्‍यातील बावी (आ) येथे जागतिक अपंग दिनानिमित्त गरजूंना ब्लॅंकेट व साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या योध्याचा सन्मान यावेळी करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य समाधान डोईफोडे होतें.प्रमुख पाहुणे सरपंच सोनल आगलावे,चित्रकार महेश मस्के,प्रा शांतीलाल काशीद,पोलीस पाटील राहुल उंबरे, प्रहार संघटनेचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे, उपाध्यक्ष सिद्धराया माळी उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष विष्णू आगलावे, उपाध्यक्ष नागनाथ उंबरे, सचिवा कविता करडे, सहसचिव विठ्ठल आगलावे, खजिनदार परशुराम उंबरे, सदस्य कैलास करडे, प्रफुल पाटील, शंकर आगलावे, वशिष्ठ आगलावे, बावी ग्रामस्थ व संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर आगलावे यांनी केले. बावी गावचे ग्रामदैवत खंडोबा मंदिर येथे समाजातील 70 अपंग तसेच गरजूंना ब्लॅंकेट व तांदळाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्टपणे सेवा बजावणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी, विविध संस्था पदाधिकारी, पोलिस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी यांना संस्थचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 
चित्रकला व शिल्पकला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे महेश मस्के यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. शंकर आगलावे यांनी अपंग दिनाचा इतिहास सांगत अपंग बांधवानी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यावर प्रकाश टाकला.जिल्हा परिषद सदस्य समाधान डोईफोडे यांनी अध्यक्षीय भाषणातुन अपंगांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.तसेच तालुक्‍यातील अपंग बांधवांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवुन देण्यासाठी विशेष शिबीर घेणार असल्याचे सांगितले.याअगोदर कोरोना महामारीच्या काळात संस्थेने रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आभार विष्णू आगलावे व सूत्र संचालन प्रफुल पाटील यांनी केले. 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT