shivteerth.jpg 
सोलापूर

दसरा महोत्सवानिमित्त शिवतीर्थ पुरस्काराचे थाटात वितरण 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने दसरा महोत्सवानिमित्त शिवतीर्थ पुरस्काराचे वितरण सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते झाले. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना शिवतिर्थ पुरस्कार जाहीर झाला होता. चितमपल्ली यांचे नातू विशाल चितमपल्ली यांनी तो स्वीकारला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. औदुंबर मस्के, महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्या मनिषा शिंदे, क्रेडाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत जेड्डामनी, शारदाश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहास कदम यांना कोविड योध्दा म्हणून शिवतीर्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

यावेळी प्रा.डॉ. सुहास पुजारी हे त्यांच्या भाषणात म्हणाले की, मराठीला ज्ञानभाषेकडे नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मारुती चितमपल्ली यांनी केले आहे. जवळपास 45 वर्ष जंगलात राहून त्यांनी ज्ञानोपासना केली. 
धर्मराज काडादी म्हणाले की, मराठा सेवा समाज सेवा मंडळाचा हा पुरस्कार प्रेरणादायी असा आहे. सर्व कोविड योद्‌ध्यांचा म्हणून आपण पुरस्कार देऊन गौरव केला ही अभिमानाची गोष्ट आहे. मारुती चितमपल्ली यांचा अभिमान सर्व सोलापूरकरांना आहे. कोरोना महामारी अजूनही संपली नाही. लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सर्वांनी दक्षता घेऊन कोरोनावर मात करणे ही काळाची गरज आहे. 

अध्यक्षीय भाषणात मनोहर सपाटे म्हणाले की, या पुरस्कारार्थींनी मनाचा मोठेपणा दाखवून सर्वसामान्य जनतेची अहोरात्र सेवा केली. त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. कोरोना काळात सामान्य माणूस, मजुर व भिकारी यांना स्वतःच्या टीमकडून दोन वेळेचे जेवण उपलब्ध करून दिले. पुरस्कारार्थीचे हे काम समाजासाठी वंदनीय आहेत. 
याप्रसंगी सर्व पुरस्कारार्थींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संस्कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे यांनी करून दिला. यावेळी विनायक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नामदेव थोरात, शहाजी सुर्वे, वसंत सावंत, मोहन गोरे, अशोक चव्हाण, दत्ता भोसले, राजेंद्र अवताडे, महादेव घुले, सुरेश पवार, किसन घुले, हरिदास गायकवाड, बबन सपाटे, दत्ता शिंदे, मधुकर पवार, महेश माने, संतोष गवळी, सुनिता साळुंके, रेखा सपाटे, सुजाता जुगदार, उषा गोकळे, जयश्री साठे उपस्थित होते. सूत्रसंचालन सारिका पंडित यांनी तर जनरल सेक्रेटरी महेश माने यांनी आभार मानले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT