mulina madat.jpg 
सोलापूर

गरजू विद्यार्थिनी व मुलांना दिली दिवाळीची भेट : आई प्रतिष्ठानचा उपक्रम  

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः येथील आई प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील पुल्ली कन्या प्रशाला व दयानंद महाविद्यालयात गरजू मुलांना दिवाळीसाठी कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले. 

कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्यांची परिस्थिती खालावली असल्याने आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला. 
पुल्ली कन्या प्रशालेच्या मातृ छत्र अथवा पितृछत्र हरपलेल्या एकूण 100 मुलींना दिवाळीनिमित्त नवीन ड्रेस, फराळ, सुगंधी उटणे, साबण व पणत्या भेट देण्यात आल्या. 
महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी उद्योजक सचिन हिरेमठ, पराग शहा, वैभव पाटील, दादासाहेब पाटील, वसंत जाधव, संस्थेचे विश्वस्त पांडुरंग दिड्डी, विजयकुमार गुल्लापल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आई प्रतिष्ठानच्या वतीने मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो. कुठल्याही अडचणींना न डगमगता सामना करीत मुलींनी शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे असे प्रतिपादन मोहन डांगरे यांनी केले. मुख्याध्यापिका गीता सादुल यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी योगेश डांगरे, सूर्यकांत जिंदम, प्रताप महवंकर, सुधाकर नराल, दादाराव चव्हाण, अविनाश शंकू, शुभम चिट्याल, विवेक नक्का, लक्ष्मीकांत यलदी आदींचे सहकार्य लाभले. यादीवाचन पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी केले. सूत्रसंचलन उमा कोटा यांनी केले तर उपमुख्याध्यापक युवराज मेटे यांनी आभार मानले. 
आई प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने दयानंद शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थिनींना आई प्रतिष्ठानच्या वतीने नवीन ड्रेस मटेरियलचे कापड भेट देण्यात आले. या वर्षी कोरोनामुळे अनेक कामगारांना दिवाळी कशी साजरी करावी याची चिंता आहे. हे लक्षात घेऊन गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत ड्रेस मटेरियलचे कापड उद्योजक बाबुभाई मेहता यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कार्यक्रमावेळी प्राचार्य विजयकुमार हुबळे, प्राचार्या कीर्ती पांडे, प्राचार्य शिरसागर, प्रा. श्री मुळीक, प्रा. देशपांडे, सचिन हिरेमठ, योगेश डांगरे, राहुल डांगरे, सूर्यकांत जिंदम, प्रताप महावरकर, सुधाकर नराल, दादाराव चव्हाण, अविनाश शंकू, लक्ष्मीकांत येलदी आदी उपस्थित होते.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT