PPE_HYD_KIT.jpg 
सोलापूर

मोठी बातमी : स्मरणपत्र देऊनही डॉक्‍टरांना मिळेना पीपीई कीट

तात्या लांडगे

सोलापूर : लॉकडाउन काळात हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णाला प्रथमदर्शनी कोरोना आहे की नाही, हे समजत नाही. त्यामुळे खासगी डॉक्‍टर, नर्स, वॉर्ड बॉय, सफाई कामगारांसाठी पीपीई कीट उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे केली. त्यानंतर स्मरणपत्रही देण्यात आले, मात्र अद्याप पीपीई कीट मिळाले नसल्याची धक्‍कादायक माहिती आयएमचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. हरिष रायचूर यांनी दिली. 

सोलापुरात इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) 800 डॉक्‍टर सभासद असून संघटनेअंतर्गत दोनशे रुग्णालये आहेत. तर राज्यभरात दिड लाख डॉक्‍टर असून त्यांनीही सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पीपीई कीटची मागणी केली आहे. मात्र, केंद्र सरकारकडून मोजकेचे पीपीई कीट उपलब्ध झाल्याने ते सरकारी दवाखान्यांमधील डॉक्‍टरांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सोलापुरातील मृत व्यक्‍ती कोरोनाबाधित असल्याचे रविवारी (ता. 12) स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील 97 जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी 67 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी एका खासगी रुग्णालयातील नर्स पॉझिटिव्ह सापडल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर खासगी डॉक्‍टरांनी आयएमएकडे धाव घेतली आहे. आता पीपीई कीट उपलब्ध झाल्याशिवाय दवाखाने सुरु ठेवली जाणार नाहीत, अशी भूमिका घेतल्याचे काही डॉक्‍टरांनी स्पष्ट केले. 

पीपीई कीट नसल्याने अन्य कीटचा होतोय वापर 
खासगी रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्‍टरांची सुरक्षितता म्हणून त्यांना डॉक्‍टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई कामगारांना पीपीई कीट देणे आवश्‍यक आहे. मात्र, डॉक्‍टरांकडे पीपीई कीट नसल्याने त्यांना पॅराशूट व एचआयव्ही रुग्णांवर उपचार करताना वापरले जाणाऱ्या कीटचा वापर करावा लागतोय. पीपीई कीटच्या तुलनेत अन्य कीट सुरक्षित नसल्याने डॉक्‍टरांना पीपीई कीट उपलब्ध करुन द्यावेत, अशी माणगी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. त्यानंतर स्मरणपत्रही दिले, मात्र अद्याप पीपीई कीट उपलब्ध झालेले नाहीत, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केले. 


स्मरणपत्रानंतरही मिळेना पीपीई कीट 
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पीपीई कीटचा मागणी यापूर्वीच नोंदविण्यात आली आहे. मात्र, जगभरातून मागणी असल्याने अद्याप पुरेशा प्रमाणात पीपीई कीट उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे खासगी हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांना पॅराशूट अथवा एचआयव्हीबाधित रुग्णांवर उपचार करताना वापरल्या जाणाऱ्या कीटचा वापर करुन रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. कोरोनाच्या वैश्‍विक संकटाशी मुकाबला करणारे डॉक्‍टरच कोरोनाचा शिकार होत असतील, तर युध्द कसे जिंकणार, असा प्रश्‍न इंडियन मेडिकल असोसिएशनचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. हरिष रायचूर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT