Dr. Milind Joshi has helped the family of Dr. Sunil Ladas in Pandharpur 2.jpg 
सोलापूर

डॉक्‍टर मित्रांच्या मदतीला धावले पंढरीतील डॉक्‍टर ! दरोडेखोरांच्या थरारात दिला दिलासा

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : आजकालच्या जमान्यात माणूस माणसाच्या मदतीला धावून जात नाही, असा सूर नेहमी ऐकू येतो. परंतु पंढरपुरातील डॉ. मिलिंद जोशी यांच्यासारख्या अनेक व्यक्ती निस्वार्थ भावनेने मदत करत समाजापुढे आदर्श निर्माण करत असतात. एखादा अपघात झाला किंवा कोणी अन्य कारणाने अडचणीत आले, तर बहुतेकवेळा लोक मदतीला पुढे येत नाहीत. विनाकारण ससेमिरा आपल्या मागे नको, अशा विचाराने मदतीसाठी जाणे टाळले जाते. परंतु काही व्यक्ती मात्र मित्र असो अथवा अनोळखी व्यक्ती असो, शक्‍य असेल ती मदत करण्यासाठी पुढे येताना दिसतात. डॉ. मिलिंद जोशी हे त्यांचे मित्र डॉ. सुनील लाड यांच्या कुटुंबियांच्या मदतीला धावून गेल्याने त्यांच्यातील मैत्रीचा धागा आणखी घट्ट झालाच. परंतु मदतीची भावनादेखील अधिक वृद्धिंगत झाली. 

येथील डॉ. सुनील लाड आणि त्यांच्या कुटुंबियांना शस्त्रांचा धाक दाखवून, मारहाण करून लुटण्याची घटना येरमाळाजवळ नुकतीच घडली. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेमुळे हादरुन गेलेल्या लाड कुटुंबियांना त्यांचे मित्र डॉ. मिलिंद जोशी यांनी रात्रीतून अवघ्या काही वेळात घटनास्थळी जाऊन धीर दिला आणि अनमोल मदत केली. प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणाऱ्या डॉ. मिलिंद जोशी यांनी प्रसंगावधानता दाखवत तातडीने हालचाली केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 

पंढरपूरमधील डॉ. सुनील लाड, त्यांच्या पत्नी डॉ. सायली लाड, निखिल लाड, भालचंद्र लाड आणि सुषमा लाड लग्न सोहळ्यासाठी अकोला येथे कारमधून गेले होते. सोमवारी रात्री ते येडशीमार्गे पंढरपूरला येत होते. रात्री सव्वाबाराच्या सुमारास अंधारात दबा धरुन बसलेल्या दरोडेखोरांनी लाड यांच्या गाडीच्या खाली लोखंडी जॅक टाकला. अचानक गाडी खाली लोखंडी जॅक आल्याने त्याचा दणका बसून गाडीतील डॉ. सुनील लाड हे जखमी झाले.

अंधारात अचानक झालेल्या या प्रकारामुळे ड्रायव्हर संभाजी पवार यांनी गाडी थांबवली. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला अंधारात थांबलेल्या दरोडेखोरांनी काठीने मारहाण करून आणि चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल सह बॅगा पळवून नेल्या. दरम्यान अचानक अंधारात झालेल्या या प्रकारामुळे हादरुन गेलेल्या लाड यांच्याकडे सुदैवाने एक मोबाईल शिल्लक राहिला होता. त्यावरून डॉ. लाड यांनी त्यांचे मित्र डॉ. मिलिंद जोशी यांना पंढरपूरला मोबाईलवरुन संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई- सकाळचे ऍप

घटनेचे गांभीर्य ओळखून डॉ. जोशी यांनी तत्काळ त्यांचे मित्र, सहकार मंडळाचे संजय जव्हेरी, अजीम तांबोळी, विष्णू खंडेलवाल यांच्यासह गाडीतून उस्मानाबादकडे धाव घेतली. मोबाईलवरुन उस्मानाबाद येथील मित्र डॉ. अविनाश नागणे यांच्याशी संपर्क साधून लाड कुटुंबियांना तातडीने आवश्‍यक वैद्यकीय उपचार करण्याची व्यवस्था केली. डॉ. जोशी यांनी त्याचवेळी त्यांच्या स्नेही, सोलापूर येथील पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती देऊन मदत करण्याची विनंती केली.

त्यांनी देखील तत्काळ उस्मानाबादच्या पोलिस अधिकाऱ्यांना घटनेविषयी कळवल्याने तेथील उपविभागीय पोलिस अधिकारी शशीकिरण काशीद, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. राठोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे हे तत्काळ घटनास्थळी पोचले. पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांनीही घटनास्थळाची पाहणी करुन तपासाची सूत्रे वेगाने हलवली. त्यामुळे काही दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. लाड कुटुंबियांना धीर देऊन उस्मानाबाद येथील डॉ. देशमुख यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉ. लाड यांच्यावर प्राथमिक उपचार करुन डॉ. जोशी हे त्यांना घेऊनच दुसऱ्या दिवशी पंढरपूरला परत आले. 

मदतीची परंपरा कायम 

अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जाण्याची डॉ. मिलिंद जोशी यांच्या घरात जणू परंपराच आहे. त्यांचे वडील बापू जोशी यांचा समाजसेवेचा वारसा डॉ. मिलिंद आणि पंढरपुरातील अनेक प्रसंगात मदतीला धावून जाणारे त्यांचे बंधू मंदार या दोघांचे यानिमित्ताने कौतुक होत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT