dr kotnis putala.jpg 
सोलापूर

पर्यटकांसाठी वेगळी ओळख असलेले डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः शहरातील मुख्य पर्यटनस्थळ असणारे पर्यटन स्थळ म्हणजे डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्मारक ओळखले जाते. या स्मारकाने सोलापूर शहराची पर्यटनाची नव्हे तर वेगळी ओळख महाराष्ट्रात करून दिली आहे. डॉक्‍टरांच्या सेवाभावी वृत्तीचे प्रतिक व आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीयांची कामगिरी यासह अनेक पैलू पर्यटकांचे मन मोहवूून घेणाऱ्या आहेत. 
शहरातील रेल्वे स्थानकाच्या लगत भैय्या चौकामध्ये या स्मारकाची भव्य वास्तु उभी आहे. 

शहराचे नाव मोठे करणाऱ्या व्यक्तीमत्वामध्ये डॉ. कोटणीसांचा समावेश आहे. दुसऱ्या महायुध्दामध्ये चीनने भारताकडे जखमी सैनिकांची सेवा करण्यासाठी डॉक्‍टरांची मागणी केली होती. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नुकतेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले सोलापूरचे डॉ. द्वारकानाथ कोटणीस हे चीनमध्ये गेले. तेथे त्यांनी अत्यंत प्रतिकुल स्थिती अपुऱ्या वैद्यकीय साधनांच्या मदतीने शेकडो चीनी सैनिकांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवले. चीन मध्ये डॉ. कोटणीस यांच्या बद्दल कृतज्ञता बाळगत तेथे त्यांच्या नावाने हॉस्पिटल व पुतळे उभारले आहेत. या व्यक्तीमत्वाच्या आठवणी जपणारे हे स्मारक आहे. महानगरपालिकेने या स्मारकाचे जतन केले आहे. 

स्मारकाच्या आवारात गेल्यानंतर हिरवळीवर डॉ. कोटणीस यांचा पूर्णाकृती पुतळा पाहण्यास मिळतो. या पुतळ्याच्या मागील भागात डॉ. कोटणीसांचे राहते घर स्मारकरुपात जतन केले आहे. एक शतकापुर्वीच्या या वास्तुचे देखणेपण समोरील लाकडी कामातून लक्षात येते. समोरील व्हरांडा व नंतर दगडी कामातील आकर्षक इमारत आहे. इंग्रज काळातील या वास्तुमध्ये भव्य बैठक, डायनिंग रुम आहे. तेथे गेल्यानंतर डॉ. कोटणीस यांच्या आयुष्यातील अनेक दुर्मिळ छायाचित्रे पाहण्यास मिळतात. डॉ. कोटणीस यांचे आईवडील, लहानपण, महाविद्यालयीन शिक्षणातील स्मृतीचित्र जपली आहेत. वैद्यकीय शिक्षण व मिळालेली स्मृतीचिन्हे या ठिकाणी संग्रहीत केली आहेत. चीनचे तत्कालीन देशाचे प्रमुख माओ, चीनी सैनिक, उपचाराची साधने अशी वेगळ्या पध्दतीची छायाचित्रे पाहता येतात. चीनची संस्कृती व देशाबद्दल असलेली रंजक माहिती मिळते. या ठिकाणीचे चीनचे तत्कालीन प्रमुख माओ झेडांग यांनी डॉ. कोटणीस यांच्या कुटुंबीयांना पाठवलेले पत्र जतन केले आहे. मुख्य इमारतीच्या बाजूला गेल्यानंतर ऑडिओ व्हीज्युअल सादरकरणाचा कक्ष केलेला आहे. त्याच्या बाजुला एक छोटे प्रेक्षागृह आहे. या ठिकाणी डॉ. कोटणीस चीन भाषा केंद्र उभारलेले आहे. येथे विद्यार्थी व अभ्यासक चीनी भाषेचा अभ्यास करतात. दरवर्षी शालेय विद्याथी व पर्यटक या स्मारकाला भेट देण्यासाठी येतात. दरवर्षी एक हजार पेक्षा अधिक लोक या स्मारकाला भेट देतात. 


स्मारकाच्या ठिकाणी काय पाहावे 
- डॉ. कोटणीस यांच्या स्मृतीरुपातील छायाचित्रे व वस्तु 
- इंग्रज कालीन बांधलेली वास्तू 
- चीनी भाषा अध्ययन केंद्र 
- डॉ.कोटणीस यांचा पुर्णाकृती पुतळा 

शहराची वेगळी ओळख असणारे स्मारक 
सोलापूर शहराची वेगळी ओळख दर्शवणारे हे स्मारक आहे. या स्मारकाच्या माध्यमातून डॉ. कोटणीस यांनी विदेशात केलेल्या कामगिरीची प्रेरणा विद्यार्थी व पर्यटकांना मिळते. विदेशातील भारतीयांबद्दलचा आदराचे हे स्मारक प्रतिक आहे. 
- प्रा.  गणेश चन्ना, डॉ. कोटणीस कार्य अभ्यासक सोलापूर  

 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT