Zimma Fugadi 
सोलापूर

कोरोनाने आम्हा महिलांच्या उत्साहावर विरजण टाकले... असे का म्हणताहेत महिला? वाचा 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : श्रावण हा भारतीय संस्कृतीमध्ये सणांचा महिना. खास करून महिलांचे नागपंचमी, नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन हे सण महिलांना आनंद आणि उत्साह देणारे आहेत. महिलांना सजण्याचे आणि साजशृंगार करण्याचे सण आहेत. तरुण मुली, नववधू यांचा आनंदी आनंद असतो. विशेष म्हणजे याच महिन्यात पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनी यांच्यासह विविध समाजांचे रथोत्सवही साजरे होतात. रक्षाबंधनासाठी भाऊ बहिणीची वाट पाहतो. परंतु, यावर्षी कोरोना या महाभयंकर अदृष्य राक्षसामुळे या सर्व सणांवर आणि आनंदावर विरजण पडणार आहे, याबद्दल महिला वर्गाकडून खंत व्यक्त केली जात आहे. 

श्रावण महिन्यातील सणांची ओढ सोलापुरातील सर्वच महिलांना लागली आहे. मात्र कोरोनामुळे वाढदिवस, लग्नकार्य आदी कार्यक्रमही आनंदाने साजरे होऊ शकले नाहीत. आता श्रावण महिन्यात श्री सिद्धरामेश्‍वरांच्या मंदिरात दर्शनाला जाता येणार नाही. नागपंचमीला माहेरचा चुडा व साजशृंगाराची भेट मिळणार नाही. रिमझिम पावसात झोके घेता येणार नाहीत. यानिमित्त भेटणाऱ्या बालमैत्रिणींची भेटही होणार नाही व झिम्मा-फुगडीसह जुन्या आठवणींमध्ये रमताही येणार नाही. रक्षाबंधनला राखी बांधल्यावर भावाकडून हट्ट करून भेटवस्तूही घेता येणार नाही. श्रीकृष्ण जयंतीला बाळकृष्णाचा पाळणाही सजवता येणार नाही. दहीहंडीचा जल्लोषही साजरा होणार नाही. त्यानंतर सर्वांच्या आवडत्या बाप्पांचा उत्सवही साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याने महिलांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. 

सामाजिक भान ठेवून घरीच सण साजरा करूया 
याबाबत येथील सुरेखा बोमड्याल म्हणतात, श्रावण हा भारतीय संस्कृतीमध्ये सणांचा महिना. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन हे सण खास महिलांचे आहेत. विशेष म्हणजे याच महिन्यात पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनी यांचा नारळी पौर्णिमेला रथोत्सव असतो. मात्र यावर्षी कोरोना या महाभयंकर विषाणूमुळे या सर्व सणांवर आणि आनंदावर विरजण पडणार आहे, याचे आम्हा महिलांना खूप दु:ख वाटत आहे. परंतु या कोरोना महासंकाटामुळे सामाजिक भान ठेवून आपण घरच्या घरी उत्सव साजरे करूयात. नागपंचमी आणि रक्षाबंधन आपण घरीच साजरा करावे. छान नटून नागपंचमीदिनी प्रतिमेचे पूजन करावे. भावाला राखी ऑनलाइन पाठवून प्रेमाचा व आपुलकीचा संदेश पाठवावा. लवकरच कोरोना संकटातून मुक्त होऊ आणि येत्या काळात निसर्गाला अनुकूल असे उत्सव साजरा करू. 

नियोजनबद्धपणे कोरोनाचा नायनाट करूया
रोटरी क्‍लब ऑफ सोलापूर एमआयडीसीच्या सदस्या सविता करनकोट म्हणतात, कोरोनामुळे सर्व सणांवर विरजण पडणार आहे, याचे दु:ख वाटते. श्रावण महिन्यात दीपपूजनाला देवळात जाता येणार नाही. नागपंचमीला माहेरचा चुडा मिळणार नाही. रक्षाबंधनलाही भावाला राखी बांधता येणार की नाही हे माहीत नाही. गणरायाचे स्वागत कसे करणार, याबद्दलही संभ्रमावस्था आहे. पण तरी कोरोनाला तर आपण हरवणारच आहोत. दसरा- दिवाळी साजरी साजरी करणार आहोत. त्यासाठी आपण सगळेजण नियोजनबद्धपणे कोरोनाचा नायनाट करायला हवा. 

पुढील एक-दोन महिन्यात येणाऱ्या सणांची यादी 

  • 20 जुलै, सोमवार : दीपपूजा अमावस्येनंतर श्रावण मासारंभ 
  • 21 व 28 जुलै : मंगलागौरी पूजन 
  • 25 जुलै : नागपंचमी 
  • 27 जुलै : श्रावणी सोमवार पहिला 
  • 3 ऑगस्ट : नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन 
  • 4 ऑगस्ट : मंगलागौरी पूजन तिसरा मंगळवार 
  • 10 व 17 ऑगस्ट : श्रावणी सोमवार 
  • 11 ऑगस्ट : मंगलागौरी पूजन आणि श्रीकृष्ण जयंती 
  • 12 ऑगस्ट : गोपालकाला 
  • 18 ऑगस्ट : मंगळागौरी पूजन 
  • 21 ऑगस्ट : हरितालिका पूजन 
  • 22 ऑगस्ट : श्री गणेश चतुर्थी 
  • 23 ऑगस्ट : ऋषी पंचमी 
  • 25, 26 व 27 ऑगस्ट : ज्येष्ठागौर आवाहन, पूजन व विसर्जन 
  • 1 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी 
  • 17 सप्टेंबर : सर्व दर्श अमावास्या 
  • 18 सप्टेंबर : अधिक अश्विन मासारंभ 
  • 17 ऑक्‍टोबर : घटस्थापना, नीज आश्विन मासारंभ 

महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT