Laya Gajul 
सोलापूर

उपचाराअभावी वडिलांच्या मृत्यूमुळे केला चिमुकलीने "हा' संकल्प; "यांनी' घेतली दखल

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात वडील आजारी पडले... त्या वेळी कुठल्याही खासगी रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला... खासगी रुग्णालयांनी नकार दिल्याने शासकीय रुग्णालयात पोचण्यास उशीर झाला अन्‌ तेथे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने वडिलांचे निधन झाले... खासगी रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा धक्का सहन करत, आपण स्वतः डॉक्‍टर होण्याचा संकल्प अकरावर्षीय मुलीने केला. आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून तिला मदतीचा हात दिला जात आहे. 

कुंभारी परिसरातील गोदूताई परुळेकर विडी कामगार वसाहत येथील रहिवासी असलेले रमेश गाजूल यांचे गेल्या महिन्यात आजाराने निधन झाले. खासगी रुग्णालयांनी वडिलांना दाखल करून घेण्यास नकार दिल्याने व त्यांच्यावर वेळेवर उपचार न झाल्यानेच त्यांचे निधन झाले, ही गोष्ट अकरावर्षीय लया गाजूल हिला खटकली. वडिलांच्या चितेला लयानेच अग्नी दिला. त्या वेळी तिने आपण मोठे होऊन डॉक्‍टर बनू व आपल्या वडिलांवर आलेला प्रसंग इतर रुग्णांवर येऊ देणार नाही, असा संकल्प केला. घरची गरीब परिस्थिती असताना चिमुकलीने केलेला संकल्प ऐकून अनेकांना आश्‍चर्य वाटले. मात्र तिचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी व तिच्या शिक्षणाला मदत करण्यासाठी आता दानशूर व्यक्ती, उद्योजक व समाजबांधव पुढे येत आहेत. 

लयाच्या शिक्षणासाठी सोलापुरातील जिल्हा खनिकर्म अधिकारी भानुचंद्र कोलप्याक, पद्मशाली सीए ग्रुपचे चंद्रकांत इंजामुरी, नरहरी कौकुंटला यांनी मदत करण्याचे जाहीर केले. लयाच्या उच्च शिक्षणासाठी बालाजी अमाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनीही मदत करणार असल्याचे सांगितले. तसेच तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून पुणे येथील विभागीय उपआयुक्त चंद्रकांत गुडेवार पाच हजार रुपये दिले, अहमदनगर येथील अजय म्याना यांनी एक हजार, सोलापुरातील श्रीनिवास यनगंदुल एक हजार, गोविंद केंची पाच हजार रुपये तर नागेश भंडारी यांनी धान्य दिले. 

समाजबांधवांचा पुढाकार 
गाजूल कुटुंबाला संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मिळण्यासाठी श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन प्रयत्न करणार आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष 
गौरीशंकर कोंडा, श्री मार्कंडेय जन्मोत्सव महामंडळाचे अध्यक्ष निरंजन बोध्दूल, फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, नागेश पासकंटी, नागेश भंडारी, गोविंद केंची, किशोर व्यंकटगिरी आदींनी लयाच्या शिक्षणासाठी मिळालेल्या निधीचे संकलन करून तिच्या कुटुंबाकडे सुपूर्द केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT