सोलापूर

निरा नदीत सोडले पाणी! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मिलिंद गिरमे

प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देऊन सावधगिरी बाळगण्याचा सूचना दिल्या आहेत.

लवंग (सोलापूर) : नीरा खोऱ्यातील नीरा देवधर, भाटघर, गुंजवणी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच सहा दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने नीरा-देवघर धरणातून पाणी सोडण्यात आले.

देवघर धरणातून सोडलेले पाणी वीर धरणात येत असल्याने वीर धरणाच्या प्रशासनाने धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने शनिवार सकाळी 6 वाजल्यांपासून वीर धरणातून नीरा नदीत 21 हजार 505 क्‍युसेक्‍सने पाणी सोडण्यास सुरवात केली आणि त्यानंतर पाण्याचा प्रवाह वाढल्याने दुपारी दोन वाजता 22 हजार 530 क्‍युसेक्‍सने पाणी सोडले जात होते. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देऊन सावधगिरी बाळगण्याचा सूचना दिल्या आहेत.

नीरा देवघर, भाटघर, आणि गुंजवणी धरण भरल्यानंतर या धरणांचे पाणी वीर धरणात येते. त्यामुळे या वरील धरणातून येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडले जाते. योग्य पाणी पातळी ठेवून नीरा नदीत पाणी सोडले जाते. त्याच बरोबर निरा डावा व उजव्या कालव्यातून कालव्यावर अवलंबून असलेल्या पाण्याचे तलाव भरून घेण्यासाठी पाणी सोडले जाते.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्‍यातील तलाव भरून घेतले जातात. यंदा गतवर्षीच्या तुलनेत चार धरणातील एकत्रित पाणी साठा पाहिला तर गतवर्षी पेक्षा आजचे दिवशी सुमारे 33 टक्के जादा पाण्याची आवक झाली आहे. नीरा उजवा कालव्यावरील सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुके आणि डाव्या कालव्यावरील बारामती, इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

24 जुलै सकाळी सहा वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा खालील प्रमाणे

निरा देवघर धरणातील पाणीसाठा...

प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता - 11"73 टीएमसी.

आजपर्यंत पडलेला पाऊस - 1391 मी.मी.

धरणात झालेला पाणीसाठा 9 "26 टीएमसी आजची टक्केवारी 78" 91 टक्के.

गतवर्षीची टक्केवारी 23 " 88 टक्के

भाटघर धरणातील पाणीसाठा....

प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता -23"50 टीएमसी.

आजपर्यंत पडलेला पाऊस 401 मि.मी.

धरणात झालेला पाणीसाठा 12" 68 टीएमसी.

आजची टक्केवारी 53 " 93 टक्के.

गतवर्षी ची टक्केवारी 38" 02 टक्के.

गुंजवणी धरणातील पाणीसाठा....

प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता-3"69 टीएमसी.

आजपर्यंत पडलेला पाऊस - 1083 मि.मी. धरणात झालेला पाणीसाठा - 2 " 92 टीएमसी. आजची टक्केवारी- 79" 14 टक्के.

गतवर्षीची टक्केवारी - 50"46 टक्के.

वीर धरणातील पाणीसाठा...

प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता- 9"41 टीएमसी.

आजपर्यंत पडलेला पाऊस - 236 मि.मी. धरणात झालेला पाणीसाठा - 8.31 टीएमसी. आजची टक्केवारी - 88"29 टक्के.

गतवर्षीची टक्केवारी 38 " 88 टक्के.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT