Covid Hospital
Covid Hospital Esakal
सोलापूर

शहरातील 13 कोव्हिड रुग्णालयांतील उपचार होणार बंद ! रेमडेसिव्हिर, ऑक्‍सिजन तुटवड्याचे कारण

वेणुगोपाळ गाडी

सोलापूर : कोरोना (Covid-19) रुग्णांकरिता ऑक्‍सिजन (Oxygen) व रेमडेसिव्हिरचा (Remdesivir) तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असल्याने महापालिका शहरातील 13 लहान खासगी रुग्णालयांमधील कोव्हिड (Covid Hospitals) उपचाराची सेवा तूर्त बंद करणार आहे. यामुळे अशा रुग्णालय चालकांमध्ये नाराजी पसरली आहे. (Due to lack of Remdesivir injection and oxygen, treatment in thirteen hospitals will be stopped)

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शासकीय तसेच ज्या मोठ्या खासगी रुग्णालयांना कोव्हिड उपचाराची मान्यता आहे, अशा रुग्णालयांवर मोठा ताण पडत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने या रुग्णालयातील बेड्‌सची संख्या कमी पडत आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण उपचारापासून वंचित असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. यातील अनेक रुग्णांना उपचाराअभावी आपला जीवही गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर गत महिन्यात महापालिकेने लहान खासगी रुग्णालयांना देखील कोव्हिड उपचाराची सेवा देण्याविषयी आवाहन केले होते. याला अनेक रुग्णालयांनी प्रतिसाद दिला. त्यांनी महापालिकेकडून रीतसर मान्यता घेऊन आपल्या रुग्णालयांमध्ये कोव्हिड उपचाराची सुविधा सुरू केली. मोठ्या रुग्णालयांमध्ये बेडअभावी नवीन रुग्णांना उपचाराची सुविधा नाकारली जात असल्याने अनेक रुग्ण

छोट्या रुग्णालयात जाऊन उपचार करणे पसंत करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने ऑक्‍सिजन व रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनच्या तुटवड्याचे कारण देत शहरातील 13 लहान खासगी रुग्णालयांना कोव्हिडची सेवा बंद करण्याचे तोंडी कळवले आहे. लवकरच लेखी सूचना देऊन रुग्णालयांमधील कोव्हिड उपचाराची मान्यता महापालिका काढून घेणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे संबंधित रुग्णालय चालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या आवाहनानुसारच आम्ही कोव्हिड सेवा सुरू केली, पण ऑक्‍सिजन व रेमडेसिव्हिर तुटवड्याचे कारण देत महापालिका अचानक आमच्या रुग्णालयातील कोव्हिड सेवा बंद करण्यास सांगत आहे. ही बाब चुकीची आहे, असे या रुग्णालय चालकांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या या अजब धोरणामुळे भावी काळात खासगी रुग्णालये कोव्हिड सेवा देण्यास प्रतिसाद देण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे महापालिकेने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी होत आहे.

ऑक्‍सिजन व रेमडेसिव्हिरच्या तुटवड्यामुळे शहरातील 13 लहान रुग्णालयांना दिलेली कोव्हिड उपचाराची मान्यता काढून घेण्यात येत आहे. ऑक्‍सिजन व रेमडेसिव्हिर पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यावर पुन्हा मान्यता देऊ.

- डॉ. बिरुदेव दूधभाते, आरोग्याधिकारी, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT