Corona 
सोलापूर

धक्कादायक : "या' तालुक्‍याच्या सबजेलमधील 28 कैद्यांसह दिवसभरात 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा येथील सबजेल 40 मधील 28 कैद्यांचे अहवाल रॅपिड अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आले. कैद्यांबरोबरच एक पोलिस अधिकारी, दोन सुरक्षारक्षक व एका डबेवालासह दिवसभरात 34 रुग्ण आढळून आले. 

याबाबतचा अहवाल काल (शुक्रवारी) रात्री उशिरा देण्यात आला. तालुक्‍यात कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी, प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतल्याचे सांगण्यात आले. संस्थात्मक विलगीकरण केलेल्यांमधील सलगर बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले तर नंदूर येथील रुग्णाशी संबंधित असलेल्याची रॅपिड ऍटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली. सबजेल मधील 12 कैद्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपात नवीन तहसील कार्यालयातील जेलमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. सलगर बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे संबंधित असलेल्या 41 कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये 39 रिपोर्ट हे निगेटिव्ह आले, तर दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यापूर्वी रुग्णाशी संबंधित कर्मचाऱ्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते व 305 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांमधील एक परिचारिका व लिपिक या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर नंदूर येथे 5 जुलै रोजी आलेल्या रुग्णाला त्रास होऊ लागल्यामुळे त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा सारीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्या रुग्णाच्या संबंधित हाय रिस्कमधील 22 नागरिकांची रॅपिड ऍटिजेन टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे तालुक्‍यात दोन नव्याने रुग्ण वाढले आहेत. ते संस्थापक विलगीकरण कक्षात आहेत. नंदूरच्या रुग्णातील संपर्कातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू असून. आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT