सोलापूर

शिक्षण व्यवस्था कालबाह्य, दर्जा उंचावण्याची गरज : डॉ. काकोडकर 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ज्ञानात नवीन भर टाकणे हे संशोधनाचे महत्त्वाचे काम आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. आजची शिक्षण व्यवस्था कालबाह्य ठरत आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत नॅक, आयक्‍यूएसी विभाग व मराठी विज्ञान परिषद, सोलापूर शाखेतर्फे विद्यापीठात डॉ. काकोडकर यांचे "तयारी ज्ञानयुगासाठी' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. कुलसचिव डॉ. विकास घुटे, डॉ. विकास पाटील, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. महेश माने, क्रीडा व शारीरिक संचालक डॉ. सुरेश पवार, प्राचार्य डॉ. शंकर नवले, प्राचार्य डॉ. एन. बी. पवार, विविध संकुलाचे संचालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, विद्यापीठास सिलेजअंतर्गत राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडून 50 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. यासंदर्भात संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य व संकुलाचे संचालक व शिक्षकांची बैठक घेतली. त्यांना समाजोपयोगी प्रकल्प तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. सिलेजअंतर्गत आंतरविद्याशाखीय व समाजासाठी उपयुक्त प्रकल्प करण्यावर विद्यापीठाकडून भर दिला जाणार आहे. या प्रकल्पामध्ये शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही समाविष्ट करून घेण्यावर विद्यापीठाचा भर आहे. यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. प्रा. सी. जी. गार्डी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. विकास पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मयूरी वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT