LLpLEaw_400x400.jpeg 
सोलापूर

महाविद्यालयीन परीक्षेबाबत ब्रेकिंग ! थेट तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांचीच परीक्षा 

तात्या लांडगे

सोलापूर : लॉकडाउन वाढल्याने 15 जूनपासून सुरु होणारे शैक्षणिक वर्ष लांबणीवर पडणार हे निश्‍चित झाले आहे. मात्र, अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करुन त्यांचीच परीक्षा नेहमीप्रमाणे घ्यावी अन्‌ प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका घरी द्याव्यात, अशी मागणी सोलापूरसह राज्यातील बहूतांश कुलगुरुंनी समितीकडे केली आहे. मात्र, ही परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, याचा निर्णय राज्यपालांवर सोपविण्यात आला आहे. 

 


राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांअंतर्गत येणाऱ्या साडेपाच हजार महाविद्यालयांमधील सुमारे 50 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा लॉकडाउनमुळे होऊ शकलेली नाही. आता राज्यातील बहूतांश विद्यापीठांच्या मागणीनुसार आता प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देण्याची सोय करण्याचा विचार पुढे आला आहे. संबंधित विद्यार्थ्यांना 15 दिवसांची मुदत देऊन त्यांच्याकडून सर्व विषयांच्या प्रश्‍नपत्रिका सोडवून त्या उत्तरपत्रिका महाविद्यालयांमधील संबंधित विषयांच्या प्राध्यापकांना ई-मेल अथवा व्हॉटसअपवर पाठवून त्याचे मूल्यमापन करता येईल, असेही कुलगुरुंनी समितीला कळविले आहे. मात्र, विद्यार्थी घरबसल्या परीक्षा देणार असल्याने पुस्तकांमधून पाहून उत्तरे लिहू शकतात. त्यामुळे त्यांच्या गुणांचे मूल्यमापन करताना मागील सेमिस्टरच्या गुणांचा विचार करावा, असेही कुलगुरुंनी समितीकडे स्पष्ट केले आहे. तर तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा असल्याने त्यांची परीक्षा नेहमीप्रमाणे घेतली जाणार आहे. तत्पूर्वी, समितीच्या अहवालानुसार राज्यपाल व उच्च शिक्षणमंत्री दोन दिवसांत निर्णय घेणार असून तो निर्णय मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेटला कळविला जाणार आहे. 

दोन दिवसांत राज्यपाल घेतील निर्णय 
पुणे, कोल्हापूर, एसएनडीटी व मुंबई विद्यापीठांच्या कुलगुरुंसह तंत्र शिक्षणचे संचालक व उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांच्या समितीने परीक्षेसंदर्भात नियोजन केले आहे. त्यांचा अहवाल दोन दिवसांत राज्यपालांना सादर होईल. परीक्षा होणारच आहेत, परंतु त्या कशाप्रकारे घ्यायच्या याचा निर्णय राज्यपाल घेतील. समितीच्या अहवालानुसार झालेला निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व कॅबिनेटला सांगण्यात येईल. 
- उदय सामंत, उच्च शिक्षणमंत्री 


समितीतील सदस्य म्हणाले... 

  • विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारसीनुसारच घेतला जाईल परीक्षेचा निर्णय 
  • ऑनलाइन परीक्षेचा विचार मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे नाही इंटरनेटची सोय 
  • प्रत्येक विद्यापीठांच्या गुणांकनाची पध्दती वेगवेगळी : त्याचा डाटा समितीने घेतला 
  • राज्यातील प्रत्येक महाविद्यालयांमार्फत घेता येईल प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा 
  • ग्रीन, ऑरेंज अन्‌ रेड झोनमधील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे स्वतंत्र नियोजनाचाही विचार 
  • प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी संघटनांकडून मागविण्यात आले परीक्षेसंदर्भात अभिप्राय 
  • लॉकडाउन वाढल्याने आगामी शैक्षणिक वर्ष निश्‍चितपणे महिनाभर लांबणीवर पडणार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातल्या आणखी चौघांना अटक, हत्येनंतर गुजरातला झालेले फरार

Latest Marathi News Updates: पाकिस्तानच्या ग्रुपवर चॅट करण्याचं प्रकरण, नागपूरमधील दोघांची एटीएसकडून चौकशी

Besan Cheela Vs Oats Cheela: वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात बेसन चीला की ओट्स चीला फायदेशीर? वाचा एका क्लिकवर

Sinhagad Road : माणिकबाग परिसरात महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT