Mangi Lake 
सोलापूर

कुकडीच्या पाण्याने भरा मांगी तलाव; शेतकऱ्यांनी केली आमदार शिंदे यांनी लक्ष घालण्याची मागणी 

नानासाहेब पठाडे

पोथरे (सोलापूर) : मांगी (तालुका करमाळा) तलावात सध्या पावसाचे व कुकडी प्रकल्पाचे मिळून 45 टक्के पाणीसाठा झाला आहे. तलावात पावसाचे काही प्रमाणात पाणी येत असून, कुकडी प्रकल्पाचे येणारे पाणी बंद झाले आहे. आमदार संजय शिंदे यांनी याकडे लक्ष घालून कुकडीचे बंद झालेले पाणी तातडीने मांगी तलावात सोडून तलाव शंभर टक्के भरावा, अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून होत आहे. 

गेली दोन वर्षे मांगी तलाव निरंक होता. या वर्षी एक जूनपासूनच पावसाने सुरवात केल्याने तलावात पाणी आले. शिवाय कुकडी प्रकल्पाचे दोन वेळा पाणी आले. हे सर्व पाणी मिळून सध्या तलावात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र आरक्षित पाण्यामुळे हा पाणीसाठा शेतीसाठी पुरेसा नाही. आमदार संजय शिंदे यांनी याकडे लक्ष घालून तातडीने बंद झालेले पाणी तलावात सुरू करून तलाव शंभर टक्के भरावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

या वर्षी सीना नदी वाहत असल्याने नदी परिसरात पाणी पातळी वाढली आहे. मांगी तलाव शंभर टक्के भरला तर रब्बी व उन्हाळा हंगामासाठी कॅनॉलद्वारे पाणी सोडता येईल. त्यामुळे मांगी, पोथरे, बिटरगाव श्री, खांबेवाडी, धायखिंडी, करंजे अशा आठ गावांत उसाचे श्रेत्र मोठ्या प्रमाणात वाढेल. यासाठी मांगी तलाव पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे आहे. 

पोथरे येथील शेतकरी धनंजय झिंजाडे म्हणाले, मांगीत लावाच्या वरील भागात पिकांना पाण्याची गरज नाही. अशा स्थितीतच तलावात जास्त काळ पाणी येऊ शकते. उशीर झाला की वरील भागातील शेतकरी कॅनॉल फोडतात. त्यामुळे पाणी येत नाही. ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन तातडीने तलावात पाणी सोडावे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT