सोलापूर

शेतकऱ्यांनी पॅकेज विरोधात केले बांधावर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा


बार्शी(सोलापूर): अखिल भारतीय किसान सभा, सोलापूर जिल्हा कौन्सिलच्या वतीने भाजप केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी आणि श्रमिकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ 27 मे रोजी देशव्यापी विरोधाच्या हाकेला प्रतिसाद देत शेतकरी बांधवांनी आपल्या शेती बांधावरूनच आंदोलन केले आहे. 

आंदोलनाचे निवेदन पंतप्रधान, मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना मेलद्वारे पाठवण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात 20 लाख कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा तपशील भांडवलदारधार्जिणा आहे. शेतकरी, शेतमजूर आणि कामगार या देशातील तिन्ही श्रमिक वर्गांसाठी अत्यंत तुटपुंजा आणि निरर्थक आहे. 

सुमारे 20 कोटी कामगारांना त्यांच्या गावी पोचवावे. त्यांना अन्न, रोजगाराची व योग्य वेतनाची हमी द्यावी. शेतकरी, शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी. भांडवलदारांना 68 हजार 607 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली, तशीच शेतकरी व शेतमजुरांची कर्जमाफी करावी. येत्या खरिपासाठी शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीककर्ज, मोफत बी-बियाणे व खते द्यावीत, रब्बीची नुकसानभरपाई द्यावी. शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगारांच्या प्रत्येक कुटुंबाला केंद्र सरकारकडून लॉकडाउन काळात दरमहा 10 हजार रुपये थेट मदत करा, 
मनरेगाच्या कामांचा विस्तार करून कामाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी द्या, पंतप्रधान किसान सन्मान योजनेत सहा हजारावरून 10 हजार रुपयांपर्यंत वाढ करावी. शेतीमालाला स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव द्यावा. 
आंतरराष्ट्रीय तेलभाव उतरल्याने 22 रुपयांनी डिझेल द्यावे, वनजमीन, देवस्थान व इनाम जमीन, गायरान जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा, कोरोनाचा विदारक अनुभव लक्षात ठेवून ग्रामीण व शहरी भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये आमूलाग्र सुधारणा कराव्यात. 
किसान सभेचे कॉम्रेड तानाजी ठोंबरे, लक्ष्मण घाडगे, लहू आगलावे, ए. बी. कुलकर्णी, धनाजी पवार, भारत पवार, किसान मुळे, प्रवीण मस्तूद, अनिरुद्ध नकाते, शौकत शेख, शिवाजी घाडगे, बालाजी ताकभाते, सुभाष कंगळे, रामेश्‍वर शिकेतोडे, पैगंबर मुलाणी, बाळासाहेब जगदाळे, नाना बराते, प्रमोद डोईफोडे, लक्ष्मण गव्हाणे, गणपत गायकवाड, विष्णू लोखंडे, शेलार, विलास गोंदिल यांनी आंदोलन यशस्वी केले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT