Solapur Crime News: 
सोलापूर

Solapur Crime News: मुलगा अभ्यास करत नाही, खोड्या काढतो, मोबाईल मागतो म्हणून बापानेच मुलाला संपवलं

Solapur Crime News:तुळजापूर रोडवर १३ जानेवारीला १४ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणात पित्यानेच आपल्या मुलाला संपवल्याचं समोर आलं होतं.

कार्तिक पुजारी

सोलापूर- तुळजापूर रोडवर १३ जानेवारीला १४ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणात पित्यानेच आपल्या मुलाला संपवल्याचं समोर आलं होतं. वडिलांनी मुलाच्या शितपेयामध्ये विषारी पावडर टाकून त्याला संपवलं होतं. पित्याला अटक देखील करण्यात आली होती. बापानेच आपल्या पोटच्या मुलाला का संपवलं असा प्रश्न अनेकांना पडला होता. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे.(father killed son because the son does not study pulls pranks asks for a mobile phone solapur crime news)

मुलगा अभ्यास करत नाही. नेहमी खोड्या काढतो आणि सतत मोबाईल मागतो या कारणासाठी वडिलांनी आपल्या मुलाला संपवल्याचं समोर आलं आहे. विजय सिद्राम बट्टू (४३) याला अटक करण्यात आल्यानंतर त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली होती. त्यामध्ये विजयने ही कबुली दिली आहे. त्याच्या या स्पष्टीकरणामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलिसांनी मुलाच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. २८ तारखेला पत्नीसोबत झालेल्या भांडणात विजय बट्टूने उडतउडत सांगितलं होतं की त्यानेच मुलाला मारलंय. त्यानंतर पत्नीचा संशय बळावला. तिने पोलिसात जाऊन यासंदर्भातील माहिती दिली. पोलिसांनी विजय बट्टूला अटक करत त्याची चौकशी सुरु केली होती.

सुरुवातीला तो पोलिसांशी सहकार्य करत नव्हता. उडवाउडवीचे उत्तरं देत होता. पण, पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी खाक्या दाखवताच तो बोलता झाला. आरोपीने अनेक खुलासे केले आहेत. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, इतक्या क्षुल्लक कारणासाठी आपल्या मुलाची हत्या केलेल्या बापावर संताप व्यक्त केला जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT