Matsya Sheti 
सोलापूर

अरे व्वा ! अक्कलकोटच्या शेतकऱ्याने निवडली सहा महिन्यांत साडेसात लाख रुपयांचे उत्पन्न देणारी शेती ! पण कुठली? वाचा सविस्तर

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : नागनहळ्ळी (ता. अक्कलकोट) येथील जावेद पटेल या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीच्या मागे न धावता मत्स्यपालनाचा वेगळा प्रयोग केला आणि त्याला अचूक तंत्रज्ञानाची जोड देत यशस्वी देखील करून दाखवला आहे. एक एकरच्या शेततळ्यातून मत्स्यपालनामधून सहा महिन्यांत साडेसात लाख रुपयांचे शाश्वत उत्पन्न मिळवून शेतकरी वर्गासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. हा नवा शेतीचा प्रयोग इतर शेतकरी वर्गात कुतूहल निर्माण करून विचार करायला लावणारा झाला आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा : लॉकडाउनमध्ये विक्रेत्यांची कोरोना चाचणी करा, सोलापूरसाठी सर्व्हेलन्स अधिकारी नेमा

शेततळ्यासाठी शासकीय अनुदानाची मदत घेऊन एक एकरमध्ये शेततळे वर्षभरापूर्वी केले होते. त्यात 5 मेपासून चिलार माशांची पैदास करून सहा महिन्यांत त्याच्या विक्रीतून साडेसात लाख रुपयांची उत्पन्नाची श्वाश्वती मिळवली आहे. शेताच्या दक्षिणेकडील क्षेत्रात जमीन, पाणी धरल्यास दलदल निर्माण होऊन एकही पीक त्या ठिकाणी येत नव्हते. त्या शेततळ्यात विजयवाडा येथून तीन रुपयांना एक याप्रमाणे अशी तीस हजार चिलार जातीच्या माशांची पिल्ले आणली. त्याला सुमारे 30 हजार रुपये खर्च करून मध्यभागी ऑक्‍सिजन पुरवठा करणाऱ्या दोन एचपी मोटार बसविल्या. वरचेवर पाण्यातील पीएच तपासणी करून ते अबाधित ठेवण्यासाठी ड्रीपने वरचे थोडे पाणी पिकांना सोडले व विहिरीतील पाणी शेततळ्यात सोडले. नियमित ऑक्‍सिजनची व पीएच पातळी व्यवस्थित राहील याची काळजी घेतल्याने केवळ तीन महिन्यांत एक मासा अंदाजे पाव किलो वजनाचा झाला आहे. तालुक्‍यातील हे पहिलेच अशा प्रकारचे मोठे शेततळे असून, इतर शेतकऱ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहे.

हेही वाचा : शहरात चार तासांत दोघांचा मृत्यू तर वाढले 29 कोरोना पॉझिटिव्ह ! एकूण रुग्णसंच्या चार हजाराच्या उंबरठ्यावर

शेततळ्यात एक कोटी लिटर पाण्याचा साठा होत असून, ते पाणी पिकांसाठीही वापरता येत आहे. इतर शेतकरीही शेततळी व मत्स्यपालन व्यवसायाकडे वळत आहेत. तीन महिन्यांनंतर आता ते मासे 300 ग्रॅम वजनाचे झाले आहेत. अजून तीन महिन्यांनी त्यांचे वजन अर्धा किलोचे होतील.30 हजार मासे सोडले असल्याने पाच हजार मासे जरी मृत झाले तरी 25 हजार मासे विक्रीसाठी उपलब्ध होतील. शंभर रुपये जरी होलसेल भाव धरला तर साडेबारा लाख रुपये मासे विक्रीतून मिळतील. पाच लाख रुपयांचा खर्च वजा जाता सहा महिन्यांत साडेसात लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. आता कित्येक शेतकरी या शेततळ्याला भेट देऊन माहिती घेऊन शेततळे करण्यासाठी जावेद पटेल यांचे मार्गदर्शन घेत आहेत.

सहा महिन्यांत माशांच्या खाद्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला
याबाबत जावेद पटेल म्हणाले, तालुक्‍यातील शेतकरी बंधूंनी सोळा महिने पाणी देऊनही पुन्हा उत्पादनाला हमीभाव मिळत नाही. नवीन वाटा स्वीकारल्याने शेती जास्त लाभदायी ठरते आहे. माझी मत्स्यशेती ही इतरांनाही प्रेरणादायी ठरावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. शेततळ्यात सोडलेले मासे सहा महिन्यांत साडेबारा टन उत्पन्न देतील. सरसकट शंभर रुपयांप्रमाणे विक्री केली तरी झालेला पाच लाखांपर्यंतचा खर्च वजा जाता साडेसात लाख रुपयाचे नेट उत्पन्न मिळत आहे. सहा महिन्यांत माशांच्या खाद्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला आहे. दिवसातून दोन वेळा हे खाद्य दिले जाते.

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: CSK विरुद्ध काय प्लॅन केला होता? सूर्यवंशीचा खुलासा; वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल म्हणाला, 'केक लावतील म्हणून...'

'माझ्या भावाने मला 'घंटागाडी'....' ठरलं तर मग मालिकेतील जुई गडकरीला घरी काय नावाने हाक मारतात? अभिनेत्री म्हणाली...

Latest Marathi News Live Update : मंत्री नरहरी झिरवाळ व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण

IPL 2026: फॉर्म, फटका आणि फोकसची परीक्षा! शुभमन गिल-श्रेयस अय्यर आज आमणे सामने; कशी असेल संभावित Playing XI

Nagpur News: कामगाराचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; कामगाराची पार्श्वभूमी व रहिवास

SCROLL FOR NEXT