Ganesh Murti 
सोलापूर

बापरे..! "यांची' कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक संकटात 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस रौद्ररूप धारण करत आहे. त्याची साखळी तोडण्यासाठी गर्दी न करता घरातच बसावे व अत्यावश्‍यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे येत्या 22 ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय गणेशोत्सव मंडळे घेत आहेत. त्यामुळे मोठ्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणारी मंडळे या वर्षी एक ते दोन फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याच्या तयारीत असल्याने मोठ्या मूर्ती बनवून तयार ठेवलेल्या मूर्तिकारांना प्रचंड नुकसानीला सामोरे लागण्याची चिन्हे आहेत. 

देशभरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मोठ्या मंडळांकडून सहा ते 12 फुटींच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापित केल्या जातात. याव्यतिरिक्त हलत्या पौराणिक देखाव्यांसाठीही मूर्तींची मागणी असते. सोलापुरातील मूर्तिकारांना दरवर्षी कोल्हापूर, पुणे, दौंड अशा मोठ्या शहरांपासून विविध जिल्ह्यांतील तालुक्‍यांसह आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक येथून तीन ते 12 फुटांच्या गणेश मूर्तींची मागणी असते. या वर्षीही मूर्तिकारांनी दिवाळीनंतर मोठ्या गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरवात केली. त्यासाठी खासगी सावकार व पतपेढ्यांमधून कर्ज काढून भांडवल उभे केले. शहरातील लहान-मोठे असे 200 च्या आसपास मूर्तिकार व एक ते दीड हजार कारागीर गणेशमूर्ती बनविण्याच्या कामात रमले. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आल्याने मार्च महिन्यापासून सर्व कामे ठप्प झाली. आता तयार केलेल्या मोठ्या मूर्ती मागणीअभावी तशाच आहेत. 

सात ते आठ हजार मोठ्या मूर्ती तयार 
दिवाळीपासून जवळपास 200 मूर्तिकारांच्या गोदामात मोठ्या गणेशमूर्ती निर्मितीचे काम जोमाने सुरू होते. सर्व मूर्तिकारांच्या मिळून तीन ते 12 फुटांच्या सात ते आठ हजार मूर्ती साच्यातून काढलेल्या आहेत. मात्र लॉकडाउननंतर उद्‌भवलेली परिस्थिती पाहता, आता त्या मूर्तींना मागणी आल्याशिवाय रंगकाम करता येत नाही. 

कोल्हापुरात परवानगी दिली तशी सर्वत्र द्या 
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आम्ही मोठ्या गणेशमूर्ती साच्यातून काढल्या आहेत. फक्त रंग देण्याचे काम बाकी आहे; मात्र लॉकडाउनमुळे सर्व ठप्प झाले. कोरोनाच्या भीतीमुळे एकाही मोठ्या मूर्तीला अद्यापपर्यंत मागणी नाही. कोल्हापुरात मोठ्या मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे, त्याप्रमाणे सर्वत्र परवानगी द्यावी. अन्यथा कर्जरूपाने घेतलेले लाखोंचे भांडवल, कारागिरांचा पगार याचा विचार करता यावर्षी सोलापूरच्या मूर्तिकारांचे कोट्यवधींचे न भरून येणारे नुकसान होणार आहे. 
- रामस्वामी चिन्नी, 
मूर्तिकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Acquisition Payment To Farmers : नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार

AUS vs IND: भारतीय संघात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मॅच विनर खेळाडूची एन्ट्री; BCCI ने जाहीर केला बदल

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी शेगावचं गजानन महाराज मंदिर बंद राहणार? सोशल मिडियावरील 'त्या' मेसेजबाबत संस्थांकडून स्पष्टीकरण...

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या नजरा 'पीएम किसान' हप्त्याकडे; कधी जमा होणार 22 वा हप्ता? जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लाभार्थी

T20 World Cup: औपचारिकता गांभीर्याने पूर्ण करणार; भारताचा आज नेदरलँड्ससोबत टी-२० विश्वचषकचा अखेरचा साखळी सामना!

SCROLL FOR NEXT