crime.jpg 
सोलापूर

वाहनचालकास अडवून लुटमार करणारी संशयितांची टोळी जेरबंद 

सुनील राऊत

नातेपुते(सोलापूर)ः शिखर शिंगणापूरच्या घाटात वाहनचालकास अडवून लूटमार करणारी संशयित टोळी नातेपुते पोलीस स्टेशनचे सपोनि युवराज खाडे व त्यांच्या पोलिस सहकार्यांनी जेरबंद केली आहे. 

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मागील आठवड्यात प्रकाश बोंद्रे रा. इंदापूर हे इंदापूर तालुक्‍यातील डेअरीचे दूध कर्नाटकातून शिखर शिंगणापूर मार्गे नातेपुते येथे घेऊन येत असताना घाटात अज्ञात इसमांनी निळ्या रंगाची कार आडवी लावून रोख रक्कम दहा हजार रुपये, मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला होता. त्याबाबत 25 सप्टेंबर रोजी नातेपुते पोलीस ठाण्यात 277/2020 भादवि कलम 394, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. 

वरील गुन्ह्याचा तपास करीत असताना शनिवार ता. 3 रोजी गुन्ह्यात वापरलेली वर्णनाप्रमाणे निळ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची झेन गाडी नातेपुते येथे संशयित फिरत असताना मिळून आल्याने ती ताब्यात घेऊन कारमधील इसमांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी आपली नावे गदर भोसले (वय 19), शिवाजी मदने (22), समीर जाधव (22), रा. तावशी ता इंदापूर अशी असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे असलेल्या वाहना बाबत चौकशी केली असता त्यांनी सदर वरील गुन्हा केल्याची कबुली देऊन इतर संशयित महावीर खोमणे (22), रणजीत उर्फ पप्पू बोडरे (22), रा. चंद्रपुरी ता. माळशिरस व प्रदीप उर्फ सोन्या मदने, रोहित भोसले, रा. तावशी असे सर्वांनी गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने ता .8 पर्यंत रिमांड मंजूर केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि युवराज खाडे करीत आहेत. 
अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि युवराज खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास करून गुन्हा उघडकीस केला आहे. 
 

,संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT