हेही वाचा : लॉकडाऊन असा मिळतोय कलागुणांना वाव
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने देशभरात सध्या लॉकडाउन सुरू आहे. गॅरेजही बंद आहेत. त्यातच गाड्या रस्त्यावर धावत नसल्याने आणखीनच परिणाम जाणवत आहे. गॅरेजमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे हातावरचे पोट असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गॅरेज बंद असल्याने तिथे काम करणाऱ्या कामगारांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. रोज गाड्या दुरुस्त केल्यातर त्यांची घराची गाडी चालते. नाही तर तीही गाडी बंद पडते अशी परिस्थिती गॅरेजवाल्यांची आहे. लॉकडाउनमुळे सध्या सर्वच बंद असल्याने हाताला कोणतेच काम नाही. घरात जवळपास 10 ते 12 जण राहतात. फक्त दोन जण कमवणारे असल्याने संपूर्ण घर चालवणे सध्या अवघड झाले आहे. साठवलेले पैसे संपले. आता खर्चालाही पैसे नाहीत. त्यामुळे पुढचे दिवस कसे काढायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने रेशन दुकानातून गहू, तांदूळ दिले; मात्र तेवढ्यावर घर चालत नाही. जगण्यासाठी इतरही गोष्टी लागतात.
आता जगावं का मरावं असा प्रश्न निर्माण झाला
सध्या लॉकडाउनमुळे दोन महिन्यांपासून गाड्या बंद असल्याने गॅरेजही बंद आहेत. त्यामुळे आमच्या हाताला काम नाही. घरची परिस्थिती हालाखीची आहे. बाहेर जाऊन काम करावे म्हटले तर पोलिस अडवतात. आता जगावं का मरावं असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने आमच्यासाठी काही तरी करावे.
- संतोष गाडे, मेकॅनिक
सध्या आर्थिक कोंडी झाली आहे
गेल्या दीड महिन्यापसून गॅरेज बंद असल्याने आमचा रोजचा संवाद बंद झाला आहे. गाड्यांचा आवाज लांब झाला आहे. यासोबतच घरची घडी आता कशी बसवायची हा प्रश्न आता अमच्यासमोर उभा राहिला आहे. सध्या आर्थिक कोंडी झाली आहे. सरकारने गॅरेज चालू करण्यास परवानगी द्यावी.
- हुसेन कट्टीमनी, मेकॅनिक
कामगारांसोबत आमचे सुद्धा हाल सुरू आहेत
आमचे दुकान बंद आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणवर कामगारांसोबत आमचे सुद्धा हाल सुरू आहेत. आम्ही कामगारांवर आणि कामगार आमच्यावर अवलंबून आहोत. कामगारांचे हातावरचे पोट असल्याने त्यांना सध्या मदत करत आहे. मात्र, किती दिवस करायची आणि कोणत्या पद्धतीने करायची प्रश्न समोर येत आहे.
- प्रकाश साळुंखे,
गॅरेज मालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.