rto-driving-license sakal media
सोलापूर

31 मार्चपूर्वी घ्या जुन्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र! एप्रिलपासून दुप्पट शुल्क

नवीन गाडी (दुचाकी किंवा चारचाकी) खरेदी करून 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यासाठी फेरनोंदणी करून आरटीओच्या माध्यामातून फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते. वाहनाच्या फेरनोंदणीसाठीचे शुल्क व हरित कर (ग्रीन टॅक्‍स) आता 1 एप्रिलपासून दुप्पट भरावा लागणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : नवीन गाडी (दुचाकी किंवा चारचाकी) खरेदी करून 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यासाठी फेरनोंदणी करून आरटीओच्या माध्यामातून फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते. वाहनाच्या फेरनोंदणीसाठीचे शुल्क व हरित कर (ग्रीन टॅक्‍स) आता 1 एप्रिलपासून दुप्पट भरावा लागणार आहे. त्यानुसार दुचाकीसाठी एक हजार रुपये आणि चारचाकीसाठी तीन हजार व इतर वाहनांसाठी साडेसात ते साडेबारा हजारांचे नोंदणी शुल्क द्यावे लागणार आहे.

पर्यावरण संतुलन राखणे आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे, अपघाती मृत्यू रोखण्याच्या दृष्टीने केंद्रीय परिवहन मंत्रालयाने आता वाहनांच्या फेरनोंदणीची कार्यपध्दती बदलली आहे. तसेच 15 वर्षे पूर्ण झालेल्या जुन्या वाहनांची फेरनोंदणी फी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय त्यांना रस्त्यावरून फिरता येणार नाही. दरम्यान, अशी वाहने रस्त्यांवर आढळल्यास आरटीओच्या माध्यमातून जप्त केली जाणार आहेत. जप्त केलेले वाहन सहा महिन्यांपर्यंत संबंधित वाहनचालक तथा मालक संपूर्ण दंड भरून नेण्यासाठी नाही आला, तर त्या व्यक्‍तीला व ज्या बॅंकेचे त्या वाहनावर कर्ज आहे, त्यांना नोटीस बजावली जाईल. तरीही, त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास त्या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. मोटार वाहन कायद्यानुसार ते अधिकार आरटीओला आहेत. रस्त्यांवर जुनाट वाहनांची मोठी गर्दी झाली असून अनेक वाहनांकडे फिटनेस प्रमाणपत्रदेखील नाही. स्क्रॅप झालेल्या मुदतबाह्य वाहनांमुळे अपघात वाढत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे त्यांना वाहनांवरील कारवाई कडक केली जाणार आहे. दरम्यान, फेरनोंदणी करताना त्या वाहनांवरील पूर्वीचा संपूर्ण दंडही भरावा लागणार आहे.

अनफिट वाहने थेट भंगारात
केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सप्रमाणे 15 वर्षांनंतर वाहंनाच्या फेरनोंदणी शुल्कात 1 एप्रिलपासून दुप्पट वाढ होणार आहे. ज्या वाहनांना 15 वर्षे पूर्ण झाली आहेत, पण वाहने आणखी फिट आहेत, त्यांना ऑनलाइन फेरनोंदणी करून घ्यावी लागेल. 15 वर्षांपूर्वीचे जुने वाहन असतानाही फेरनोंदणी करून फिटनेस प्रमाणपत्र न घेतलेल्यांची वाहने थेट भंगारात टाकली जातील, असा इशारा आरटीओ अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे सर्वांनी वेळेत फेरनोंदणी तथा फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.

खासगी वाहनांची फेरनोंदणी
दुचाकी
400 ते 500 रुपये
तीनचाकी
800 ते 1000 रुपये
मालगाडी
1000 ते 1500 रुपये

व्यावसायिक वाहनांची फेरनोंदणी
दुचाकी
1000 रुपये
तीनचाकी
3000
हलकी वाहने
7500
मध्यम मालगाडी
10,000
अवजड वाहने
12,500

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT