gold Esakal
सोलापूर

सोलापुरात सोने खरेदी 6 कोटींनी वाढली! दरातील चढ-उतार सुरूच

सोलापुरात सोने खरेदी 6 कोटींनी वाढली! दरातील चढ-उतार सुरूच

प्रकाश सनपूरकर

सोने- चांदी बाजारात मागील महिनाभरात सोन्याच्या भावात चढ-उतार जोरात सुरू आहे.

सोलापूर : शहरातील सोने (Gold) - चांदी (Silver) बाजारात सोन्याच्या दरातील चढउताराचा फायदा घेणाऱ्या गुंतवणूकदारांच्या (Investors) खरेदीने मागील आठवडाभरात खरेदीचा आकडा सहा कोटी रुपयांनी वाढला आहे. तरीही आंतरराष्ट्रीय उलाढालीने सोन्याची उपलब्धता देखील काही प्रमाणात ताणली गेली आहे. सोने- चांदी बाजारात (Gold-Silver Market) मागील महिनाभरात सोन्याच्या भावात चढ-उतार जोरात सुरू आहे. 9 ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव एकदम एक हजार रुपयांनी कमी झाले होते. त्यानंतर ते पुन्हा वाढत गेले. पण काही महिन्यांपूर्वी वाढलेल्या दराचा अंदाज घेत सोने पुन्हा 50 हजारांच्या पुढे जाणार, असे गृहीत धरून खरेदीचा जोर वाढला आहे. ग्राहकी वाढली तरी व्यापाऱ्यांना काही प्रमाणात मालाची उपलब्धता आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे पुरेशा प्रमाणात होत नाही.

आंतरराष्ट्रीय फंड्‌सच्या आधारावर भावात चढ-उतार होत आहेत. त्याचा परिणाम बाजारात फार मोठ्या प्रमाणात होत आहे. डॉलरमध्ये सोन्याचे भाव कमी- जास्त झाल्याने हा परिणाम खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे. दोन महिन्यांपूर्वी सोन्याच्या दराने मारलेली उसळी ग्राहकांनी लक्षात घेत या चढ-उताराचा फायदा खरेदीसाठी घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत. गुंतवणूकदारांनी ही संधी सोडायची नाही, असा पवित्रा घेतल्याने खरेदीचा आकडा वाढला आहे. मागील आठवड्यात शहरामध्ये खरेदीचा आकडा सहा कोटी रुपयांनी वाढला आहे. खरेदीचा जोर वाढला तरी पुन्हा सोन्याच्या उपलब्धतेवर देखील ताण आहे.

सोने खरेदीचा खेळ रंगला

  • आठवडाभरात खरेदीचा आकडा सहा कोटींनी वाढला

  • आंतरराष्ट्रीय बाजारातील दरात चढ-उतार सुरूच

  • पुरवठा व मागणी यात सतत होतोय बदल

  • मागणी उतरली की भाव होताहेत कमी

  • सोन्याची मोड देण्याचे व्यवहार कोरोनानंतरही स्थिरच

बाजारात सातत्याने सोने दराची चढ-उतार सुरूच आहे. त्याचे परिणाम कमी- अधिक प्रमाणात बाजारावर होत आहेत.

- मिलिंद वेणेगूरकर, सराफ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

शाहरुख खानच्या घरी गणपती बसतो पण त्याची पूजा कोण करतं? अभिनेत्याने स्वतः सांगितलं नाव, म्हणाला-

दारुबंदीने काय मिळालं? सुप्रीम कोर्टाने सांगितले ५ तोटे, महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट, अंदमानात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT