Highway 
सोलापूर

"या' जिल्ह्यातील महामार्गांची कामे गतीने करण्याचे "यांनी' दिले आदेश

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून मराठवाडा, कर्नाटक, कोकण यांना जोडणारे महामार्ग जातात. वन, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य रस्ते विकास महामंडळ व संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी शिल्लक असलेली भूसंपादनाची कामे मार्गी लावून शहराला जोडणाऱ्या महामार्गांची कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्गांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भरणे यांनी सूचना केल्या. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, भारतीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजीव कुलकर्णी, राज्य रस्ते महामंडळाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांच्यासह भूसंपादन अधिकारी, प्रांत उपस्थित होते. 

पालकमंत्री श्री. भरणे म्हणाले, पालखी मार्गाच्या कामांसोबत इतर महामार्गांची कामे त्वरित होणे गरजेचे आहे. वन विभागाशी महसूल, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन कालबद्ध कार्यक्रम तयार करावा. रस्त्यासाठी उत्खनन करताना शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत, याबाबत काळजी घ्यावी. या वेळी उपवन संरक्षक पी. एच. बडगे यांनी वन विभागाच्या अडचणी मांडल्या. त्यावर इतर जिल्ह्यांत वापरलेली पद्धत इथेही वापरा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चौपदरी तर सार्वजनिक बांधकाम आणि राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दुपदरी रस्त्यांच्या 21 प्रकल्पांचे काम सुरू आहे. यात 61 हजार 459 जमीन मालक बाधित झाले असून त्यांना नियमानुसार भरपाईची रक्कम देण्याचे काम गतीने सुरू असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avian Influenza: देशात एव्हीयन इन्फ्लूएंझा व्हायरसची एन्ट्री! चिकन आणि अंडी विक्रीवर बंदी; 'हे' नियम पाळले नाहीत तर मोठा धोका

ती मला भेटायला का नाही आली? घराला कुलूप, अचानक झाली गायब; रजनीकांत यांचं ते प्रेम ज्याचा घाव आजही ताजा आहे

Pune Traffic Police : नववर्षाच्या रात्री पुण्यात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर धडक कारवाई; २०८ मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे!

Government Decision on Gig Workers : ‘गिग वर्कर्स’बाबत सरकारचा मोठा निर्णय! ‘Social Security Cover’सह बरच काही मिळणार मात्र...

Junnar Migratory Bird : युरोपातून येणाऱ्या रेड क्रेस्टेड पोचार्डची जुन्नर तालुक्यात प्रथमच नोंद; जैवविविधतेसाठी ऐतिहासिक क्षण!

SCROLL FOR NEXT