Corona Banner 
सोलापूर

कोरोना : गुटखा खाणाऱ्यांनो, आमच्या परिसरात फिरकू नका !

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने त्यातून कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. त्यामुळे सर्व भाजीपाला, फळविक्रेते, फेरीवाले व भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी गुटखा, तंबाखू खाऊन चिप्पा भाजी मार्केट व आमच्या परिसरात प्रवेश करू नये, असे आवाहन करणारे 15 डिजिटल फलक चिप्पा भाजी मार्केट येथील रहिवाशांनी लावले आहेत. 

नागरिक घेत नाहीत गांभीर्याने 
कोरोनाच्या मगरमिठीत जग अडकले आहे. भारतातही हजारोंच्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. काल-परवापर्यंत कोरोनामुक्त राहिलेल्या सोलापूर शहरातही आता कोरोनाचे 12 रुग्ण आढळले असून, त्यातील एकाचा अहवाल येण्यापूर्वीच पहिला बळी गेला आहे. अशा दुष्टचक्रात शहर अडलेले असताना नागरिक अजूनही गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. मास्क न लावता बाहेर पडणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, विनाकारण बाहेर पडून गर्दी करणे, गुटखा, तंबाखू आदी खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. 

सत्तर फूट रोड भाजी मंडई सध्या अशोक चौक येथील चिप्पा भाजी मंडई येथे भरत आहे. त्यामुळे या भागात भाजीपाला, फळे व जीवनावश्‍यक साहित्यांचे विक्रेते तसेच भाजी विकत घेणाऱ्यांची वर्दळ मंडई परिसरातील रस्त्यांवर खूप वाढलेली आहे. कित्येक फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, नागरिक व वाहनधारक येता-जाता गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकत आहेत. जर चुकून कोरोना संक्रमित व्यक्ती थुंकलेली असेल तर त्याचे गंभीर परिणाम आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी व भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना होण्याची शक्‍यता आहे. म्हणून भाजीपाला, फळ विक्रेते व भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी गुटखा खाऊ नये व रस्त्यावर थुंकू नये, याबाबत चिप्पा भाजी मंडई परिसरातील नागरिकांनी जनजागृतीसह आवाहन करीत आहेत. तसेच डिजिटल फलक लावून जनजागृतीही करीत आहेत. 

या परिसरात पहाटे चारपासून विविध ठिकाणांहून भाजी विक्रेत्यांची वर्दळ सुरू असते. भाजी खरेदी करणारे ग्राहकही मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र भाजी, फळांचे विक्रेते गुटखा खाऊन शेजारीच थुंकत असतात. त्याचप्रमाणे काही ग्राहकही परिसरात थुंकत असल्याने कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे डिजिटल बॅनर्स लावून जनजागृती केल्याने काही प्रमाणात परिणाम दिसून येत आहे. 
- यादगिरी बोम्मा, 
रहिवासी, चिप्पा भाजी मार्केट परिसर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Success Story: एकाच वेळी मामा भाचे झाले क्लासवन अधिकारी; एमपीएससी परीक्षेत शिर्ल्याच्या मामा भाच्यांची दमदार कामगिरी

Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात चौथ्या वाघावर शिक्कामोर्तब, कुंभार्ली घाटात वाघाचे दर्शन

Winter Body Detox: औषधांची गरज नाही; हिवाळ्यात शरीर डिटॉक्स करण्याचे ५ सोपे उपाय

SCROLL FOR NEXT