Gym 
सोलापूर

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी द्या "या' व्यवसायाला परवानगी 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर सध्या तरी कुठलेही औषध नाही. कोरोनापासून बचाव करण्यासाठी एकतर संसर्ग टाळणे व शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे याची आवश्‍यकता असते. त्यासाठी सकस आहार व योग्य व्यायाम गरजेचा असतो. मात्र रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारे जिमखाने सध्या बंद असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूशी लढण्यासाठी शहरातील जिमखाने सुरू करावेत, अशी मागणी जिमचालक करीत आहेत. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे तीन महिन्यांपासून शहरातील जिमखाने बंद आहेत. सध्याच्या घडीला प्रत्येकाला रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी होमिओपॅथिक गोळ्या, आयुर्वेदिक काढा घेण्याचे सल्ले दिले जात आहेत. मात्र आपण जे सेवन करतो त्याचे योग्य पचन झाल्यासच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासाठी जिमखान्यांमध्ये व्यायाम करण्याला प्राधान्य दिले जाते. त्या पार्श्‍वभूमीवर जिमखाने सुरू करण्याबाबत प्रशासनाकडे मागणी करूनही प्रतिसाद मिळत नाही. जिमखाने बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेले कर्मचारी बेरोजगार झाले असून, त्यांचा पगार व इतर खर्च देण्यासाठी एका जिमखाना चालकाला महिन्याला दीड ते दोन लाख रुपये नुकसान सहन करावे लागत असल्याचे जिमखाना चालकांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

जिमखाने बंद असल्याचा परिणाम 

  • 90 टक्के जिमखाने हे भाड्याच्या जागेत सुरू आहेत. 
  • जवळपास सर्व जिमखान्यांचे भाडे 50 हजार रुपयांवर आहे. त्यातून सवलत मिळावी, अशी मागणी आहे. 
  • जिममध्ये साफसफाई कामगार, कोच, डायटेशन, ट्रेनर्स, रिसेप्शनिस्ट व समुपदेशक यांचा पगार सुरू आहे. 
  • थ्री-फेज वीज कनेक्‍शनचे चार्जेस जिमखाने बंद असतानाही सुरू आहेत. 
  • साहित्याचे भाडे, बॅंकांचे व्याज, टीव्ही केबल, मेंटेनन्स अशा प्रकारे जवळपास महिना दीड ते दोन लाखांचा होतोय खर्च. 

जिमखान्यात होणार सुरक्षेसंबंधी उपाययोजना 
सध्याच्या घडीला कोरोनाशी लढण्यासाठी जिमखाने सुरू होणे गरजेचे आहे. जिमखाना सुरू करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व सुरक्षेसंबंधी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. बुटांशिवाय जिममध्ये प्रवेश मिळणार नाही, नॅपकिन नेहमी सोबत आणावे, सुरक्षेची काळजी विद्यार्थ्यांसह सर्वांनीच घ्यावयाची आहे. गर्दी टाळण्यासाठी दोन-तीन शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांच्या वेळा निश्‍चित करू. प्रशासनाने याबाबत विचार करून जिमखाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. 
- आनंद गोसकी, 
जिम चालक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : वाशिम-कारंजा मार्गावर CNG गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट; जीवितहानी टळली

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT