kalyan rao birajdar.png 
सोलापूर

अरेव्वा : डोंगराळ जमिनीवर जिद्दीने फुलवलेल्या शेतीचा 'त्यांनी' केला यशस्वी प्रयोग !

राजशेखर चौधरी

अक्कलकोट(सोलापूर): शेतीच्या कामाची वेळेची शिस्त व पिकांची योग्य देखभाल केल्यास अगदी डोंगराळ प्रकारच्या जमिनीवर चांगले उत्पादन घेता येते याचे उदाहरण गोगाव येथील शेतकरी कल्याणराव बिराजदार यांनी घालून दिले आहे. चांगले उत्पादन घेऊन बाजारातील शेतमाल भावाचे चढउतार लक्षात घेत पिकांतील फेरबदलाचा पायंडा त्यांनी पाडला आहे. 

अक्कलकोट तालुका तसा हा रब्बी पिकाचे जास्त पेरणी होणारा आणि त्यालाच नेहमी अनुकूल पाऊस पडणारा तालुका म्हणून गणला जातो. आता गेली काही वर्षे खरीप पिके सुद्धा जास्त घेतली जात आहेत ज्यात गोगाव ता.अक्कलकोट येथे राहणारे कल्याणराव बिराजदार हे शेतकरी यांच्याकडे 46 एकर डोंगराळ भागात असणाऱ्या मध्यम प्रतीच्या जमिन आहे. या जमिनीचा पोत सुधारत श्री. बिराजदार यांनी चांगल्या प्रकारे मशागत, चांगली बियाणे योग्य प्रकारे देखभालीची शिस्त लावत शेती केली. 
कोणत्याही शेतीकामात वेळ न लावता वेळच्या वेळी ती कामे करणे हा त्यांचा शिरस्ता आहे. या परिसरात तसा खरिपांची शेती फार कमी पावसाने फारशी होत नाही. रबीच्या हंगामावर शेती अवलंबुन आहे. तरी देखील कल्याणराव बिराजदार चांगले उत्पादन मिळवतात. 

यावर्षी त्यांनी मूग सात एकर, उडीद अकरा एकर, तूर पंधरा एकर तसेच कलिंगड दोन एकर अशी पिके घेतली आहेत. या वर्षी पावसामुळे सर्व काही वेळेवर जुळून आल्याने सर्व पिके खूप बहरली आहेत. लॉकडाउन काळात वांगे आणि काकडी या पिकात नुकसान सोसावे लागले होते. पण त्याची भरपाई टोमॅटो या पिकाने करून दिली. या पध्दतीने त्यांनी पिकांचे फेरबदल करत मागील पिकांचे नुकसान भरून काढण्याचे सातत्याने प्रयोग केले. त्यांच्या या पॅटर्नकडे आता परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. अगदी डोंगराळ भागात शेती उत्तम होत असेल तर चांगल्या जमिनीत खुप काही होऊ शकते हा विश्‍वास देण्याचे काम यामधून झाले. वीस किलोमीटर परिसरात असणारे शेतकरी कल्याणराव बिराजदार यांच्याकडून शेती कामाचा सल्ला घेण्यासाठी आवर्जुन भेटतात. 

योग्य वेळी शेतीची कामे उपयोगी 
शेती करणे म्हणजे गरिबी घराला आणणे ही भ्रामक कल्पना तरुणांनी डोक्‍यातुन काढून टाकावी. अगदी समजून घेऊन योग्य वेळी शेतीची कामे वेळेत होऊन देखभाल केल्यास शेतीत यश मिळू शकते. गावातील युवकांनी आपले अमूल्य वेळ वाया न घालविता शेतीकडे वळावे 
- कल्याणराव बिराजदार. रा.गोगाव 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरलं! 'वैद्यकीय पदवी नसताना चालवला दवाखाना'; तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा, अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया

Pune News: शीव, पाणंद, रस्त्यांची गावदप्तरी नोंद होणार; जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे समितीची राज्य सरकारला शिफारस

'मी जेवणात उंदीर खाल्लाय' 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, 'हे ऐकून माझ्या....'

Ahilyanagar Crime:'सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले'; अकोले तालुक्यात उडली खळबळ

Latest Marathi News Live Updates : रायगडमध्ये तूफान पाऊस, रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT