yoga.jpg
yoga.jpg 
सोलापूर

योगाच्या माध्यमातून कोरोनाविरुध्द लढाईचा तो करतोय जागर

सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः कोरोनाच्या आजारात योगासन व योग शैलीने स्वतःची प्रतिकारक्षमता आजाराविरुद्ध लढण्यासाठी वापरता येते हा संदेश देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग व सूर्यनमस्कारपटू स्वप्नील हरहरे काम करत आहे. लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने पाच हजार लोकांशी संवाद साधून कोरोना विरुद्ध लढाई लढली आहे. 

स्वप्नील हरहरे हा सोलापूरचा योगपटू म्हणून सर्वत्र परिचित आहे. सूर्यनमस्कार घालण्याचे अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. स्वप्नीलने एशियाच्या पातळीवर एका तासात 481 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम केला आहे. जागतिक स्तरावर देखील त्याच्या या विक्रमाची नोंद घेतली आहे. सूर्यनमस्कार व योगाच्या संदर्भात या विक्रमासोबत त्याने अनेक प्रकारचे उपक्रम राबवले आहेत. 

कोरोनाच्या संकटात त्याने योगा व कोरोना या विषयावर अनेक प्रकारचे व्हिडिओ तयार केले. या माध्यमातूून योगाद्वारे कोरोनविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकार क्षमता कशी विकसित करता येईल यावर त्याने सातत्याने प्रचार केला. नियमित योगा व योग जीवनशैलीने कोरोनाचा संसर्ग रोखता येतो या मुद्‌द्‌यावर ही मोहीम त्याने राबवली. एकूण पाच हजार लोकांपर्यंत हा संदेश पोचवण्याचे काम त्याने केले. कोरोना हा केवळ प्रतिकार क्षमतेशी जोडलेला आजार आहे. उत्तम प्रतिकारक्षमतेसाठी दररोज सूर्यनमस्कार, धनुरासन, अर्ध मत्स्येंद्रासन ही आसने उपयुक्त ठरतात. तसेच कपालभाती, अनुलोम-विलोमचे चारही प्रकार उपयुक्त आहेत. आहारात व्हिटॅमिन सीचा स्त्रोत असलेले लिंबू, संत्री अशी फळे खावीत. अँटिऑक्‍सिडंट असलेल्या भाज्यांचा उपयोग करावा. 

कोरोना संसर्ग प्रतिकारक्षमतेवर अवलंबुन 
कोरोना रुग्णांचा अभ्यास केला तर अनेकांना कोरोना झाला तरी ते लक्षणापासून मुक्त आहेत. तर संतुलीत जीवनशैली नसलेले अनेकजण कोरोना आजाराला बळी पडत आहे. यावरून शरीराची प्रतिकारक्षमता विकसीत करणे मोलाचे ठरते 
स्वप्निल हरहरे, आंतरराष्ट्रीय सुर्यनमस्कार व योगपटू  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT