bedana.jpg 
सोलापूर

पंढरपूर बाजारात बेदाण्याला सर्वाधिक प्रती किलो 261 रुपयांचा दर !

भारत नागणे

पंढरपूर(सोलापूर)ः अनलॉक जाहीर झाल्यानंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणा,केळीसह इतर शेती मालाच्या खरेदी विक्रीला गती आली आहे. गौरी गणपती सणाच्या काळात येथील बेदाणा सौदे बाजारात बेदाण्याची चांगली आवक झाली. यामध्ये प्रती किलो 261 रुपयांचा उच्चांकी तर सरासरी 150 रुपये दर मिळाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सहा महिन्यांपासून बाजार ठप्प झाला होता. राज्य शासनाने अनलॉक जाहीर केल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेती मालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार आता हळू हळू सुरु झाले आहेत. सोशल डिस्टन्स आणि सर्व नियमांचे पालन करुन येथील बाजार समितीमध्ये बेदाणा सौदेबाजार सुरु झाला आहे. 

गौरी गणपती सणाच्या तोंडावर येथील बेदाणा सौदे बाजारात चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला मोठी मागणी झाली. सौदे बाजारात उच्च प्रतीच्या बेदाण्याला सर्वाधिक प्रती किलो 261 रुपयांचा दर मिळाला. लॉकडाऊन काळा नंतर शेतकर्यांना हा सर्वाधिक दर मिळाल्याचे सांगण्यात आले. 
मंगळवारी (ता.25) झालेल्या बेदाणा सौदे बाजारात 15 ट्रक बेदाण्याची आवक झाली होती. सर्व बेदाण्याची विक्री झाली. चांगल्या बेदाण्याला 261रुपयांचा तर कमी प्रतीच्या बेदाण्याला 50 रुपयांच्या पुढे दर मिळाला. येथील बेदाणा बाजारात सरासरी प्रती किलो 150 रुपयांचा दर मिळाला. 
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील बेदाणा सौदेबाजारपेठ ही पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. राज्यासह शेजारील कर्नाटक राज्यातून शेतकरी बेदाणा विक्रीसाठी घेवून येतात. येथे विक्री झालेल्या बेदाण्याला रोख स्वरुपात वेळेवर पैसे दिले जातात. चोख व्यवहार आणि पारदर्शी सौदे बाजारामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बेदाणे बाजाराची उलाढाल वाढल्याचे बाजार समितीचे उपसभापती विवेक कचरे यांनी सांगितले. 

बेदाण्याची आवक वाढली 
येथील बेदाणा सौदेबाजारात बेदाण्याची आवक चांगली वाढली आहे. अनलॉक नंतर बेदाण्याच्या खरेदी विक्री व्यवहारांना गती आली आहे. येथे झालेल्या सौदे बाजारात चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला 261 रुपयांचा उच्चांकी तर चांगल्या बेदाण्याला सरासरी 150 रुपयांचा दर मिळाला आहे. 
- सोमनाथ डोंबे, बेदाणा व्यापारी, पंढरपूर 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापुरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा! किरकोळ वादातून दोन निर्घृण खून, सख्खा भाऊ बनला पक्का वैरी

Beed News: घरकुल घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; केज येथील ‘सकाळ’ने उघड केलेला सव्वाचार कोटींचे प्रकरण

Nashik Highway: नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी, हजारो वाहने अडकली; वाहनचालकांसह प्रवासी संतापले, टोल भरूनही त्रास!

Kolhapur Girl End Life : कल्याणीला भिती नववी नापास होण्याची, कोणालाही न सांगता तिने जे केलं ते धक्कादायक; कोल्हापुरातील घटनेने हळहळ

Latest Marathi News Live Update : खासदार मेधा कुलकर्णी नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेणार

SCROLL FOR NEXT