Double seat Esakal
सोलापूर

बाईकवर डबलसीट फिरताय तर सावधान ! लायसनसह होणार वाहन जप्त

दुचाकीवर डबलसीट फिरल्यास लायसनसह होणार वाहन जप्त

तात्या लांडगे

सोलापूर : रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाताना अथवा रुग्णालयात रुग्णाला भेटायला जाताना, दुचाकीवरून डबलसीट जाण्यास परवानगी नाही. अत्यावश्‍यक सेवेशिवाय दुचाकीवरून फिरण्यावरही निर्बंध आहेत. त्यामुळे निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांची दुचाकी जप्त केली जाईल, असा इशारा पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढत असल्याने अनेकांचे नातेवाईक विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची सेवा करण्यासाठी त्यांचे नातेवाईक दुचाकीवरून फिरतात. त्यांच्याकडे त्यासंबंधीचा पुरावा असणे बंधनकारक आहे. कारण, रुग्णालयात जातोय म्हणून अनेकजण शहरात इतरत्र फिरतात, त्यांना चाप बसेल, असेही डॉ. धाटे म्हणाल्या.

तर दुसरीकडे, पुरावा जवळ ठेवून रुग्णालयात जाणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, अशा सूचनादेखील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. दंड वसूल करणे यापेक्षाही आता कोरोनावर नियंत्रण मिळविण्यालाच पोलिसांचे प्राधान्य आहे, असेही त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले. नागरिकांनी नियमांचे पालन तंतोतंत केल्यास सोलापूर शहरातील कोरोना निश्‍चितपणे कमी होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे वाहन जप्त केले जाणार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच त्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबितदेखील होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

दंडात्मक कारवाईपेक्षाही कोरोनाला रोखण्यास प्राधान्य

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हाच पोलिसांचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई होण्यापूर्वीच नागरिकांनी नियमांचे पालन करायला हवे. शहरात दुचाकीवरून डबलसीट फिरण्यावर निर्बंध असून ते दुचाकीस्वार दवाखान्यात नातेवाइकांचे जेवण घेऊन जातात, त्यांच्याकडे पुरावा असणे आवश्‍यक आहे.

- डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक

आजपासून केंद्र सर्व्हिस संचारबंदी कालावधीत बंद

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 1 मेपर्यंत शहरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असून रुग्णालयात अथवा अत्यावश्‍यक सेवेसाठी ये-जा करणारे लोक त्यांच्या दुचाकीवरून इतरत्र फिरतात. तरीही शहरात इतरत्र थांबलेल्या दुचाकी टोईंग व्हॅनच्या (क्रेन) माध्यमातून उचलून नेण्याचे प्रकार वाढले होते. त्यामध्ये रुग्णांसाठी औषधे, जेवण घेऊन जाणाऱ्यांची वाहनेही उचलून नेली जात होती. या पार्श्‍वभूमीवर क्रेनच्या माध्यमातून दुचाकी उचलून नेणे बंद करण्याचे आदेश पोलिस उपायुक्‍त डॉ. धाटे यांनी संबंधितांना दिले आहेत. ज्या ठिकाणी नाकाबंदी आहे, तिथे पोलिसांनी ताब्यात घेतलेली बेशिस्तांकडील वाहने नेण्यासाठीच क्रेनचा वापर करावा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : प्रमाणपत्र मिळाले तरी वैधता कठीण, जीआर कोर्टात टिकणार का? संभाजी ब्रिगेडला शंका

Ichalkaranji Politics : इचलकरंजीत शिंदे गट, भाजपचे टेन्शन वाढवणार? ३५ जागांची केली चाचपणी; महायुतीसाठी वजनदार मंत्र्यांच्या घरी बैठक

Post Office Scheme : आता हॉस्पिटलच्या खर्चासाठी काढावे लागणार नाही कर्ज, टपाल विभागाची 'ही' योजना आहे खास; ५ लाखांपर्यंत होणार उपचार

Larry Ellison: हवेली-रिसॉर्ट ते स्वत:च्या नावावर एक बेट; लॅरी एलिसन यांच्या जगभरातील प्रसिद्ध प्रॉपर्टीज कोणत्या?

Latest Marathi News Updates : सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यात पावसाचा कहर

SCROLL FOR NEXT