in maharashtra first put national flag solapur nagar palika british action on 7 proud moment for solapur
in maharashtra first put national flag solapur nagar palika british action on 7 proud moment for solapur Sakal
सोलापूर

Solapur News : राष्ट्रीय निशाण नगरपालिकेवर फडकविण्याचा पहिला मान सोलापूरचा

सकाळ वृत्तसेवा

Solapur News: महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा नगरपालिकेवर राष्ट्रीय निशाण म्हणजे तिरंगा ध्वज फडकवण्याचा मान सोलापूर नगरपालिकेने पटकावला. यासाठी जवळपास सातजणांना कारावासाची शिक्षाही झाली. तर ब्रिटिशांनी लष्कराच्या सैन्यांकरवी हा ध्वज उतरवला. ही राज्यातील एकमेव पहिली घटना ज्यामुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

आजही तो ध्वजस्तंभ तसाच उभा आहे, ज्याचे आजही नैमित्तिक पूजनही केले जाते. काही दिवसांपूर्वी छताचे काम करताना या ध्वजस्तंभाला इजा पोचू नये याची दक्षता घेत काम करण्यात आले.

महात्मा गांधी यांनी आपल्या दांडी मार्चला सुरवात करण्याचा मुहूर्त साधून, काँग्रेस कार्यकर्ते व नगरपालिका सदस्य गोविंदलाल कन्हय्यालाल अवस्थी यांनी ६ एप्रिल १९३० रोजी नगरपालिकेवर राष्ट्रीय निशाण लावावे असा ठराव ४ एप्रिलच्या सभेत आणला.

या ठरावामुळे स्वाभिमानी आणि राष्ट्रप्रेमी सभासदांच्या कसोटीचाच क्षण आला. ठरावास डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर यांनी अनुमोदन दिले. या ठरावावर बाबालाल वकील यांनी ‘मी राष्ट्रीय निशाणाच्या विरुद्ध नाही, पण ही योग्य वेळ नाही असे मला वाटते’, असे आपले मत व्यक्त करून तटस्थ भूमिका घेतली.

राष्ट्रीय सभासद शेठ गुलाबचंद हिराचंद यांनीही आपले मत तटस्थ म्हणूनच नोंदविले. शेठ गुलाबचंद यांचे सहकारी व राष्ट्रीय पक्षाचे सभासद रामभाऊ राजवाडे जे कर्मयोगीचे संपादक होते, त्यांनी ठरावाला पाठिंबा देणारे भाषण करून आपले मत ठरावाच्या बाजूने नोंदविले.

या ठरावावर जेव्हा मतदान घेण्यात आले, तेव्हा तटस्थ म्हणून खा. सा. बाबालाल, शेठ गुलाबचंद हिराचंद, रा. व. लिमये, रेवणसिद्धप्पा सलगर, खतालसाहेब फुलमामडी, हणमंतराव पेंटर, श्री. वड्डेपल्ली, द. ग. साठे, हाजी महंमद करीमसाहेब मन्यार, सय्यद महंमद हफीज या दहा सभासदांनी नावे नोंदविली; तर खा. व. इमाम, महंमद इसाक हजरतखान,

व पी. के. कदम या तिघांनी आपली विरोधी म्हणून मते नोंदविली. ठराव बहुमताने मंजूर झाला. ६ एप्रिल १९३० रोजी पुण्याचे पुढारी देशभक्त अण्णासाहेब भोपटकर यांच्या हस्ते हे राष्ट्रीय निशाण पालिकेवर उभारले गेले.

अशाप्रकारे राष्ट्रीय निशाण नगरपालिकेवर फडकविण्याचा पहिला मान सोलापूर नगरपालिकेने, राजसत्तेच्या कोणत्याही दबावाची पर्वा न करता मिळविला, असे श्री. अवस्थी म्हणाले होते. डॉ. मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे निशाण उभारण्यात आले होते. त्यांचेही नाव आरोपींच्या यादीत असल्याने त्यांच्या घराचा ताबा मिल्ट्रीने घेतला होता. ते काहीकाळ भूमिगतही झाले होते.

यांना झाला कारावास व दंड

दुर्दैवाने त्यानंतर लवकरच शहरात मार्शल लॉ बसल्यामुळे पहिला प्रहार त्या वेळचे नगराध्यक्ष शेठ माणिकचंद रामचंद शहा यांच्यावर झाला. त्यांनी राष्ट्रीय निशाण उतरविण्याचे नाकारल्याबद्दल व ऑनररी मॅजिस्ट्रेट होण्यास नकार दिल्याबद्दल त्यांना ६ महिने सक्त मजुरी व १० हजार रुपये दंड अशी कठोर शिक्षा ठोठावण्यात आली.

नंतर नगरपालिकेवरील हे राष्ट्रीय निशाण काढण्याकरिता लष्करी अधिकाऱ्यांच्या हुकुमावरून नगरपालिकेवर छापा टाकण्यात आला. चौफेर रस्त्यांची नाकेबंदी करून सशस्त्र लष्करी सैनिकांच्या हातून उतरविण्यात आले.

देशभक्त गोविंद कन्हैयालाल, रामभाऊ राजवाडे, बंकटलाल सोनी, शेठ माणिकचंद शहा, डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर या म्युनिसिपॅलिटीच्या सभासदांना अप्रत्यक्षपणे ह्या निमित्ताने कारावास भोगावा लागला.

ही आपल्या सोलापूरच्या शौर्याची निशाणी आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील याचे अनन्यसाधारण महत्त्व असून ही प्रेरणादायी वास्तू आहे. यापूर्वी या इमारतीवर इतर प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न झाला पण आम्ही त्यास विरोध केला. आजही इमारत सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

- अशोक जानराव, कामगार नेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT