leopard 
सोलापूर

बिबट्याने पाडला पुन्हा वासराचा फडशा! चार दिवसांत दुसरी घटना

चंद्रकांत देवकते

दोन्हीही वासरे खाल्लेले दोन्ही पिडीत शेतकऱ्यांचे आडनाव ताकमोगेच

मोहोळ (सोलापूर): लोखंडी खांंबाला बांधलेल्या वासराचा गळ्यातील दोर न तुुुटल्याने बिबट्याने चारच दिवसाच्या अंतराने शिरापुर (सो) येथे शुक्रवार (ता.६) च्या मध्यरात्री फडशा पाडल्याची घटना शिरापूर येथे घडली. यामुळे शेतकऱ्यामध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरापूर (सो) येथील पिडीत शेतकरी भारत उर्फ (बापू ) अशोक ताकमोगे यांची लांबोटी-शिरापूर रोडवर पिरसाहेब  देवस्थानाजवळ शेती आहे .स्वत:च्या शेतामध्येच त्यांनी जनावरासाठी उभा केलेल्या शेडमध्ये जनावरे बांधली होती. गुरुवारी (ता. पाच) रोजी रात्री नऊच्या दरम्यान ताकमोगे यांनी जनावरांना चारा देऊन घरी आले होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवार (ता.सहा) रोजी सकाळी सहाच्या दरम्यान जनावराचे दूध काढण्यासाठी शेडकडे गेले असता दावणीलाच एका जर्सीगाईच्या वासराचे पोट फाडून खाल्ल्याचे दिसले. वासराच्या गळ्यालाही दात लागले असून वासराला  बांधलेली नवीन दोरी न तुटल्यामुळे वासराला जागेवरच फडशा पाडला. त्याचा एक पाय बिबट्या घेऊन गेला आहे.  

मंगळवारी (ता.3) ऑगस्ट रोजी दिग्वीजय ताकमोगे यांच्या वासराचा फडशा बिबट्याने पाडला होता. त्यामुळे दोन्हीही पिडीत शेतकरी ताकमोगेच असून दोघांच्या शेतातील अंतर मात्र सुमारे चार ते पाच किलोमीटर आहे. अवघ्या चारच दिवसाच्या अंतराने शिरापूरमध्ये बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला करण्याची दुसरी घटना घडली असून शेतकरी व नागरिकामध्ये बिबट्याची मोठ्या प्रमाणावर दहशत पसरली आहे. लोकप्रतिनिधी व सरकारी यंत्रणेने याची दखल घेऊन लवकरात लवकर बिबट्याचा काहीतरी बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी गावकरी व वर्गातून होत आहे. या घटनेबाबत वनखात्याला कळविले असून वनखात्याचे पथक घटनास्थळी थोडया वेळात पोहचत असल्याची माहिती वनरक्षक सचीन कांबळे यांनी दिली .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघातून वगळले, म्हणून Rinku Singh पेटला! २४० च्या स्ट्राईक रेटने स्फोटक खेळी; समीर रिझवी, माधव कौशिक यांचेही अर्धशतक

Year End 2025: 'हे' हेल्थ ट्रेंड राहिले सर्वाधिक चर्चेत, जाणून घ्या काय आहे खास

Latest Marathi News Live Update : दत्तजयंती, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या संगमाला सुपरमून, आकाशात दुर्मिळ असा तेजस्वी चंद्र दिसणार

Kolhapur News : दौलत-अथर्व कारखान्याकडून उसाला ३५०० दर जाहीर; स्वाभिमानींच्या सातत्यपूर्ण लढ्याला मिळाला यश

Indigo Emergency Landing : अहमदाबाद विमानतळावर 'इंडिगो' विमानाचे आपत्कालीन लँडिंग; बॉम्बच्या धमकीने उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT