Corona Test
Corona Test Esakal
सोलापूर

विनाकारण फिरणाऱ्यांची "कोरोना टेस्ट' ! पॉझिटिव्ह आल्यास रवानगी थेट कोव्हिड सेंटरमध्ये

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : शहर व तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग (Covid-19) वाढत असताना अनेक लोक विनाकारण फिरत आहेत. अशा लोकांची कोरोनाची टेस्ट (Corona Test) केली जाणार आहे. टेस्टमध्ये जे नागरिक बाधित दिसून येतील, त्यांना कोव्हिड केअर सेंटर (Covid Care Center) येथे ठेवण्यात येणार आहे. अर्बन बॅंकेजवळील रस्त्यावर केलेल्या तपासणीत चार लोक बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना कोव्हिड केअर सेंटर येथे पाठवण्यात आले असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले. (In Pandharpur corona test is being conducted on those who roam without any reason)

या वेळी तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, पोलिस निरीक्षक अरुण पवार उपस्थित होते.

पंढरपूर अर्बन बॅंक येथील परिसरामध्ये पोलिस प्रशासनाच्या वतीने अचानक नाकाबंदी लावून शहरात विनाकारण फिरणाऱ्या 42 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये चारजण कोरोना बाधित आढळून आल्याने त्यांना 65 एकर येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांना कोरोनाबाबत नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. तसेच यासाठी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. तरीही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत.

शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची शहरातील विविध ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात आली. यासाठी आरोग्य व पोलिस विभागाचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, प्रशासनाने दिलेले सूचनांचे पालन करावे, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे, असे उपविभागीय अधिकारी कदम यांनी या वेळी सांगितले.

तालुक्‍यातील ग्रामीण भागामध्येही आरोग्य व पोलिस विभागाचे संयुक्त पथक तयार करून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अचानक कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT