Solapur University News esakal
सोलापूर

विद्यापीठात राजीनामा सत्र! संकेतस्थळावर एक अन्‌ दप्तरी दुसरेच प्र-कुलगुरु

"नॅक'च्या कामापासून "एमसी' मेंबर दूरच

तात्या लांडगे

मागील चार-पाच वर्षांत विद्यापीठाचा नावलौकिक वाढला, परंतु या काळात महत्त्वपूर्ण पदांवरील एकही व्यक्‍तींने कार्यकाळ पूर्ण केला नाही, हे विशेष.

सोलापूर : एका जिल्ह्यासाठी विद्यापीठ म्हणून पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची (Solapur University) ओळख आहे. मागील चार-पाच वर्षांत विद्यापीठाचा नावलौकिक वाढला, परंतु या काळात महत्त्वपूर्ण पदांवरील एकही व्यक्‍तींने कार्यकाळ पूर्ण केला नाही, हे विशेष. दोन प्र-कुलगुरु, दोन कुलसचिव, तीन परीक्षा नियंत्रक, एक वित्त व लेखा अधिकारी आणि इन्क्‍युबेशन सेंटरप्रमुखांनी राजीनामा (Resigned) दिला आहे. प्र-कुलगुरु डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनीही नुकताच राजीनामा दिला आहे.(Solapur University News)

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने दिक्षांत समारंभासाठी (Convocation Ceremony) स्वतंत्र पुस्तिका तयार केली. त्यामध्ये पहिल्यांदा प्र-कुलगुरु म्हणून डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांचा फोटो व नाव होते. परंतु, त्यांनी राजीनामा दिल्याने त्यावर डॉ. व्ही. बी. पाटील यांचा फोटो लावण्यात आला. मात्र, विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अजूनही प्र-कुलगुरु म्हणून डॉ. मिश्रा हेच आहेत. त्यांनी राजीनामा दिला, परंतु अधिकृत पदभार दुसऱ्याकडे सोपविला नाही. तरीही, डॉ. पाटील यांच्याकडे पदभार दिल्याबद्दल मिश्रा यांनी नाराजी व्यक्‍त केली. प्र-कुलगुरु, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक ही विद्यापीठाच्या यंत्रणेतील महत्त्वाची पदे असून त्यांना विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तरीही, त्यांच्याकडे आलेली प्रत्येक फाईल कुलगुरुंच्या दालनात नेण्याचे बंधन त्यांच्यावर घालण्यात आल्याचेही बोलले जात आहे. एका परीक्षा नियंत्रकाविरुध्दचा खटला न्यायालयात सुरु असून त्याचा अंतिम निकाल अजून लागलेला नाही. मात्र, कामकाजातील हस्तक्षेपाला कंटाळून चार वर्षांत नऊ जणांनी राजीनामा दिल्याचीही चर्चा आहे. यासंदर्भात कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरु डॉ. विकास पाटील, कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.

"नॅक'च्या कामापासून "एमसी' मेंबर दूरच

पुढील महिन्यात नॅक मूल्यांकनासाठी (NAAC Assessment) दिल्लीचे (Delhi) पथक पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात येणार आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाची जोरदार तयारी सुरु आहे. परंतु, लोकनियुक्‍त विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचीही त्यासाठी मदत घेणे अपेक्षित आहे. मात्र, बहुतेक सदस्यांना विद्यापीठाकडून त्यासंबंधीचा काही निरोप दिला गेलेला नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आणि सिनेट सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्यांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्‍यता आहे.

राज्यपाल नियुक्‍त प्र-कुलगुरुंनाच 'मेमो'

कुलगुरु व प्र-कुलगुरु यांची नियुक्‍ती थेट राज्यपालांकडून केली जाते. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर राज्यपाल हेच कारवाई करु शकतात. तरीही, विद्यापीठाच्या नावलौकिकासाठी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करताना कुलगुरुंनी तत्कालीन प्र-कुलगुरु डॉ. मिश्रा यांना मेमो दिला. त्यांच्याकडे आलेली प्रत्येक फाईल कुलगुरुंकडे देण्याचे बंधन, निर्णय घेताना ढवळाढवळ, कामात सातत्याने हस्तक्षेप करणे, यातूनच त्यांनी राजीनामा दिल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Recruitment : जिद्दीला सलाम! गवंडी काम करत धरणग्रस्त शब्बीर सय्यद यांची मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीत चमकदार झेप

Who is Krish Bhagat? ३ दिवसांपूर्वी रिप्लेसमेंट, आज Mumbai Indians कडून पदार्पण; आमदाराचा पुतण्या IPL 2026 गाजवण्यासाठी सज्ज

Maharashtra Police Transfers : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या एसपींची बदली, पोलिस प्रशासनात मोठे बदल

Nashik Crime : भोंदू खरातला पाचव्या गुन्ह्यात २३ पर्यंत कोठडी; बचावपक्षाचा जोरदार विरोध

Chakur Crime News: नवऱ्याच्या प्रेयसीला फसवण्यासाठी चुलतीकडून पुतण्याचा खून

SCROLL FOR NEXT