सोलापूर

नातं रक्तापलीकडचं! राखीच्या प्रेमाने बहिण-भावांचे उजळले नाते

वेणुगोपाल गाडी

हा एकप्रकारे त्यांनी समाजापुढे ठेवलेला आदर्शच होय.

सोलापूर: नाती फक्त रक्ताच्याच असतात असे काही नाही. काही वेळा एखाद्या कारणानिमित्त रक्त, जात धर्मापलीकडे जाऊन देखील अतूट नातेबंध निर्माण होतात. असेच ऋणानुबंध सोलापूर शहरातील मानलेल्या बहिण-भावांनी जपले आहे. हा एकप्रकारे त्यांनी समाजापुढे ठेवलेला आदर्शच होय.

शहरातील नामवंत उद्योजक बाबुशेठ गांधी यांना राजेश, दीपक, किरण, विनोद, संजय ही पाच मुले आहेत. आपल्याला मुलगी नसल्याची खंत बाबुशेठ यांना होतीच शिवाय त्यांच्या पाच मुलांनादेखील बहिण नशीबी नसल्याचे मनस्वी दु:ख होते. सिद्धेश्‍वर पेठेत राहणाऱ्या दिगंबर जैन धर्माच्या गांधी कुटुंबाशेजारीच आळंदकर नामक स्वकुळसाळी समाजाचे एक कुटूंब राहात असे. या कुटुंबात लक्ष्मी, सुनीता, अनिता अशा तीन मुलीच होत्या. एका घरात बहिण तर एका घरात भावाची उणीव होती. याच समदु:खातून ही दोन्ही कुटूंबे वावरत होते. शेजारधर्मातून आळंदकर कुटुंबातील तीनही मुलींचे गांधी कुटुबांत येणे-जाणे होते. बाबूशेठ त्यांना मुली तर शेठजींची पाच मुले बहिण मानत. यातून रक्षाबंधनाच्या निमित्ताने हे नाते दृढ होत गेले.

गत 40 वर्षांपासून या बहिणी आपल्या लाडक्‍या बंधूंना राखी पौर्णिमेरोजी आवर्जुन राखी बांधतात. एवढेच नव्हे एकमेकांच्या सुख-दु:खात ते समरस होतात. या तीनही बहिणींचे विवाह झाले असले तरी मानलेल्या भावांसमवेतच्या नातेसंबंधात कधीच खंड पडू दिला नाही हे विशेष. तीन बहिणींपैकी एक सुनीता ही विवाहानंतर पंढरपुरात राहायची. गांधी कुटुंबातील विनोद हे दरवर्षी न चुकता सुनीता यांच्या घरी जाऊन राखी बांधून घेतात. दुर्दैवाने सुनीता यांचे गतवर्षी निधन झाले. विवाहानंतर सोलापुरातच राहणाऱ्या लक्ष्मी व अनिता यांनी गांधी कुटुंबासमवेत जोडलेली नाळ कायम ठेवली आहे. बाबूशेठ गांधी यांना एक बहिण असून त्या पुण्यात राहतात. रक्षाबंधनरोजी बहिणीला सोलापुरात येणे जमत नसल्याने बाबूशेठ हे लक्ष्मी, अनिता यांना बहिण मानून त्यांच्याकडून राखी बांधून घेतात हे येथे उल्लेखनीय.

बहिण-भावाची उणीव दोन कुटुंबांनी काढली भरुन

जातधर्माच्या पलीकडे जाऊन जपले नाते

एकमेकांच्या सुखदु:खात होतात समरस

दरवर्षी न चुकता साजरा करतात रक्षाबंधनाचा सण

अनोख्या ऋणानुबंधांचा समाजापुढे ठेवला आदर्श

लक्ष्मी, सुनीता व अनिता यांनी आमच्या कुटुंबातील बहिणीची उणीव भरुन काढली. या बहिणींची माया आम्ही कधीच विसरू शकत नाही. बहिण-भावाचे मानलेले नाते सख्ख्या नातेपेक्षाही श्रेष्ठ आहे.

-विनोद गांधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT