solapur.jpg 
सोलापूर

चेंबर ऑफ कॉमर्स व महापालिकेच्या प्रचार मोहिमेचे उदघाटन 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः महानगरपालिका व सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेसाठी प्रचार स्टिकर लावण्याच्या कामाचे उदघाटन महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते झाले. 

महाराष्ट्र राज्यामध्ये कोव्हीड- रुग्णांमध्ये मृत्युमध्ये लक्षणीय रित्या भर पडत आहे. या पुढे कोव्हीड- नियंत्रण कार्यवाही जनतेच्या सहभागातून आवश्‍यक आहे. या साठी राज्य भर "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" हि मोहीम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. 

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या मोहिमे अंतर्गत सोलापूर महानगरपालिका व सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सर्व व्यापारी पेठांमध्ये " मास्क नाही, तर प्रवेश नाही व नो मास्क, नो एंट्री असे आवाहन करणारे जनजागृती स्टिकर्स तयार करून शहरातील सर्व दुकानांमध्ये लावण्याची मोहिम आखली. तसेच शहरातील सर्व पेट्रोल पंपाच्या ठिकाणी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या मोहिमे अंतर्गत जनजागृतीचे बॅनर लावण्याच्या कामाचा प्रारंभ महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर चे अध्यक्ष राजू राठी, मानद सचिव धवल शहा, खजिनदार राजगोपाल झंवर, निलेश पटेल, सुकुमार चंकेश्वरा, संजय कंदले, शैलेश बचुवार, चेतन बाफना, इंदरलाल होतवाणी, रामशेठ पंजवाणी, दयासागर सालुटगी, राजू नाशिककर, महेन्द्र कटारिया, विकी ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT