Maize
Maize 
सोलापूर

"या' तालुका खरेदी-विक्री संघात मक्‍याची आधारभूत किंमत 1760 रुपये!

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मका हमी भाव खरेदी केंद्राचे उद्‌घाटन तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला दर देण्यासाठी खरेदी-विक्री संघाने चांगले योगदान दिल्याचे प्रतिपादन तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे म्हणाले, की मकासाठी आधारभूत किंमत 1760 रुपये असल्याने खरेदी केंद्रामुळे तालुक्‍यासह व इतर तालुक्‍यांतील सर्व उत्पादकांचा फायदा होणार आहे. नोंदणी केल्यानंतर एसएमएस प्राप्त होताच मका विक्रीसाठी हमीभाव केंद्रावर द्यावी. विक्री केलेल्या मक्‍याची रक्कम ऑनलाइन बॅंक खात्यावर जमा होणार आहे. यावर्षी शेतकऱ्याच्या गुणात्मक उत्पन्नात वाढ होण्यासाठी संस्थेने अद्ययावत धान्य चाळण बसविली आहे. चालू आर्थिक वर्षात तालुका खरेदी- विक्री या संस्थेकडून 287 शेतकऱ्यांची तूर 1488 क्विंटल खरेदीची रक्कम रुपये 86 लाख 30 हजार रुपये जमा केले जात आहेत. हरभरा 4014.50 क्विंटल खरेदी झाला असून त्याची रक्कम एक कोटी 95 लाख 70 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे कामकाज चालू आहे. हरभरा व मका खरेदी ही 15 जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. 

याप्रसंगी सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे, दामाजी कारखान्याचे संचालक राजेंद्र सुरवसे, मोहन कौंडुभैरी, सत्यजित सुरवसे, बाबूभाई मकानदार, हणमंत मासाळ, कार्यालयीन अधीक्षक रामचंद्र मासाळ, गोदामपाल श्री. घाडगे, व्यवस्थापक शंभू नागणे, खरेदी केंद्र विभाग प्रमुख मच्छिंद्र कोंडुभैरी, रणजित इंगोले, दत्तात्रय कांबळे, अरुण माने, दत्तात्रेय टुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. हनुमंत मासाळ यांनी प्रास्ताविक केले. सत्यजित सुरवसे यांनी आभार मानले. या वेळी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT