महापालिका शाळांचा आज निर्णय! दोन सत्रात भरणार शाळा Esakal
सोलापूर

गड्या आपली मराठी शाळाच बरी! झेडपी,महापालिका शाळांचा वाढली पटसंख्या

खासगी इंग्रजी शाळांचे आकर्षण ग्रामीणमधील पालकांमध्येही आहे. पण, त्या शाळांचे भरमसाठ शुल्क आणि पालकांना इंग्रजी जमत नसल्याने मुलांचा अभ्यास घेण्यात येणाऱ्या अडचणींमुळे पालक आता मुलांना जिल्हा परिषद व महापालिकांच्या शाळेतच घालत आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : खासगी इंग्रजी शाळांचे आकर्षण ग्रामीणमधील पालकांमध्येही आहे. पण, त्या शाळांचे भरमसाठ शुल्क आणि पालकांना इंग्रजी जमत नसल्याने मुलांचा अभ्यास घेण्यात येणाऱ्या अडचणींमुळे पालक आता मुलांना जिल्हा परिषद व महापालिकांच्या शाळेतच घालत आहेत. अधिकाऱ्यांनीही गुणवत्ता वाढीसाठी कृतियुक्त शिक्षण व उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या पुन्हा वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गावातील मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर शाळा सुरु झाल्या. खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळा व इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करतानाही जिल्हा परिषद व महापालिकांच्या शाळा तग धरून आहेत. यंदाच्या संचमान्यतेत पटसंख्या वाढल्याने महापालिकेच्या ५८ शाळांमधील आणि जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळांमधील एकही शिक्षक अतिरिक्त झालेला नाही. दरम्यान, कोरोना काळात भरमसाठी फी घेतलेल्या बहुतेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंदच होत्या. पण, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पारावरील शाळा सुरु होती. कोरोना नियमांचे तंतोतंत पालन केल्याने त्या काळात सर्व विद्यार्थी कोरोनापासून दूर राहिले. स्वामी यांनी लोकसहभागातून ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम राबविला. त्यांच्या या दोन्ही उपक्रमाचे कौतूक शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शाळांना पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी त्यांनी शिक्षकांना शिस्तीचे धडे दिले. शाळा व्यस्थापन समितीलाही त्यांनी अधिकाराची जाणीव करून दिली. गुणवत्ता वाढीसाठी सर्वजण प्रयत्न करीत असल्याने ‘गड्या आपली जुनी मराठी शाळाच बरी’ असे पालकांचे मत झाले आहे.

  • शाळांच्या पटसंख्या वाढीसाठी...
    १) दूरवरील विद्यार्थ्यांसाठी पारावरील, वाडीवरची शाळा उपक्रम
    २) मुलांना मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, पोषण आहार
    ३) स्वच्छ शाळा, सुंदर शाळेतून इमारती झाल्या आकर्षक
    ४) खेळांचे साहित्य, ई-लर्निंगची सोय आणि यु-ट्युबवरूनही शिक्षण
    ५) शिष्यवृत्तीसाठी ज्यादा तास, शिष्यवृत्तीची फी जिल्हा परिषदेतर्फे भरली जाते
    ६) विद्यार्थ्यांच्या बुध्दिमत्तेला वाव देण्यासाठी एमटीएस, एनएमएमएस परीक्षेत सहभाग

झेडपी, महापालिका शाळांची स्थिती
झेडपीच्या एकूण शाळा
२७९८
विद्यार्थी संख्या
२,०१,७८८
महापालिका शाळांची संख्या
५८
विद्यार्थी संख्या
५९,३००

शाळेच्या वेळेत शिक्षकांकडे मोबाईल नकोच
विद्यार्थ्यांच्या बालमनावर विपरित परिणाम होऊ नये, गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने शिक्षकांना अध्यापन कार्य करताना त्या वेळेत मोबाईलचा वापर करता येणार नाही, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्या शिक्षकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तीनवेळा दंड करूनही संबंधित शिक्षकाने शाळेच्या वेळेत मोबाईल वापरणे बंद केले नाही, तर त्यांचा मोबाईल जप्त करण्याची मुभाही स्वामी यांनी शाळा व्यवस्थापन समितीला दिली आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

महापालिका शाळांमध्ये २५० मुले वाढली
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर यांना झेडपीत काम करण्याचा अनुभव असल्याने त्यांनी महापालिका शाळांच्या गुणवत्तेवर पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न केले. आता गतवर्षीच्या तुलनेत महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या २०० ते २५० मुलांनी वाढली आणि त्यामुळे महापालिकेला अजून पाच ते सहा शिक्षकांची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2026

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT