Independent MLA Rajendra Raut said that he will meet Sharad Pawar and Chief Minister Thackeray for the development of Barshi  
सोलापूर

अपक्ष आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, बार्शीच्या विकासासाठी घेणार शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट !

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : वरिष्ठ पातळीवर राजकारणात कोणत्या पक्षाचा आहे, असे पाहिले जात नाही. शहराच्या व तालुक्‍याच्या विकासाला महत्त्व दिले जाते. बार्शी शहर अन्‌ तालुक्‍याच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन निधी व अनुदान उपलब्ध करून घेणार आहे, असे मत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मांडले. 

हे ही वाचा : शिवसेनेने मागितली एकच महिला- बालकल्याण समिती ! एमआयएम अन्‌ वंचित आघाडी ठरणार किंगमेकर
 

तालुक्‍यात जनतेसाठी काम करायचे असते. या नेत्यांना भेटण्यात मला काही अडचण वाटत नाही. तालुक्‍यात हरितक्रांती करण्यासाठी रखडलेली उपसा सिंचन योजना, उजनी जलाशय ते बार्शी पाणीपुरवठा नवीन पाइपलाइन, बारा गावांचा विजेचा प्रश्न, सौरऊर्जा प्रकल्प, नगरोत्थानसाठी 150 कोटी रुपये, शासकीय औद्योगिक वसाहत असे प्रश्न मोठे आहेत. बार्शीसाठी उजनीतून पाणीपुरवठा योजना 1996 रोजी कार्यान्वित झाली असून, पाइप जीर्ण झाले असल्याने वारंवार गळती होत आहे. तांत्रिक अडचणींना रोजच प्रशासनाला तोंड द्यावे लागत आहे. यासाठी शंभर कोटींपेक्षा अधिक निधीची गरज आहे.

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, दोन लाखांचे पुढे गेली आहे. त्यामुळे स्वच्छता, रस्ते याकडे लक्ष दिले असून आगामी तीन महिन्यांत शहरातील सर्व रस्ते पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. लॉकडाउनमध्ये बिहार, उत्तर प्रदेशचे मजूर स्वगृही गेलेले परत आले नसल्याने कामे थांबली आहेत. लॉकडाउनमुळे नगरपालिकेची 40 कोटी रुपये घरपट्टी थकीत राहिली. नागरिकांना पैसे मागणे शक्‍य नव्हते पण आता रोज 30 ते 40 लाखांची वसुली होत आहे. नागरिक स्वतः येऊन कर भरत आहेत. 

बार्शी तीर्थक्षेत्र दर्जा 'क' वरून 'ब' मध्ये करायचा, शाळा क्रमांक एक येथे शाळेसह भक्तनिवास नवीन इमारत उभी करायची आहे, असेही आमदार राऊत यांनी या वेळी सांगितले. 

"शरद पवार म्हणाले होते, विकासाची अडचण असल्यास भेटत जा'
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, पद्मसिंह पाटील खासदार पदासाठी उभे होते. बार्शी तालुक्‍याने भरभरून मते दिल्याने निवडून आले. त्या वेळी पवार साहेबांनी फोन करून आभार मानले होते. विकासाची अडचण आली तर भेटत जा, असा शब्द दिला आहे, असे आमदार राऊत यांनी या वेळी स्पष्ट केले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

WPL 2026 All Team Players: दीप्ती शर्मा महागडी खेळाडू, तर मुंबई इंडियन्सनेही केरसाठी मोजले ३ कोटी; पाहा लिलावानंतरचे सर्व संघ

Rajan Patil: ''त्या' दोघांना मानवी विष्टा खायला घातली'', पंडित देशमुख खून प्रकरणाची धक्कादायक पार्श्वभूमी

Barshi Crime : बार्शीत एसटी वाहकाला मारहाण; कॉलर पकडून धमक्या, ३ हजार रुपये गायब; दोघांवर गुन्हा दाखल!

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT