Solapur News 
सोलापूर

संरक्षणाच्या बाबतीत भारत जगात एक क्रमांकाची शक्ती होईल : प्रकल्प संचालक डॉ.काशिनाथ देवधर यांचे मत 

बाबासाहेब शिंंदे

पांगरी(सोलापूर) ः स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत पाश्‍चिमात्य राष्ट्राचे संरक्षण क्षमतेत 50 वर्ष मागे होता. पण स्वातंत्र्योतार 70 वर्षात आज आपण सर्व प्रगत राष्ट्राच्या संरक्षण सिध्द क्षमतेत आहोत. आकाश,भू, जल सेना आणि आंतरिक्ष उपग्रह प्रक्षेपण, स्थिरीकरण आणि प्रसारणामध्ये भारत जगात एक क्रमांकाची व्यवस्था व शक्ती होईल असा सार्थ विश्वास भारत संरक्षण मंत्रालय संलग्न डी.आर.डी.ओ.चे प्रकल्प संचालक आणि जेष्ठ शास्त्रज्ञ व शास्त्र निर्मिती तज्ञ डॉ.काशिनाथ देवधर यांनी व्यक्त केला. 

ते बार्शी येथे महाराष्ट्र आझाद कामगारांच्या सहसभेत बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रहास गंभीर होते.यावेळी व्यासपीठावर उपअभियंता श्री.घारे, बी.आर. देशमुख आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना देवधर म्हणाले की, सियाचीन भागातील भौगोलिक स्थिती, कारगील युध्दाचा धाडसी अनुभव आणि भारतीय जवानांचे मानसिक शारिरीक सामर्थ्याचे कौतुक केले. त्यांनी प्रयत्नपूर्वक बनविलेल्या 84 एम एम लाईट वेट लॉचर गन आणि विमानवेधी बनविलेल्या तोफाबद्दल सविस्तर माहिती दिली. माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी, स्व.अटलबिहारी वाजपेयी, स्व.राजीव गांधी, स्व.राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या समवेत आलेले प्रेरणादायक अनुभव सांगितले. 
यावेळी चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी प्राचार्य सी.बी.गंभीर यांनी प्रास्ताविक केले तर आभार बी.आर. देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामराजे सुर्यवंशी, हेमंत मस्के, डॉ.नंदन गंभीर, डॉ.अजिता गंभीर, भिमराव मस्के, राजाराम माने, स्वप्निल तुपे, मन्मथ कोरे, तेजस्विनी मस्के यांनी प्रयत्न केले. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT