oxymeter.jpg 
सोलापूर

मंगळवेढ्यात साथरोग सर्वेक्षणाला सुरुवात 

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा(सोलापूर): जिल्ह्यात कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता शहरात नगरपरिषदेकडून थर्मल स्क्रिनिंगनंतर आता ऑक्‍सिमीटर व ग्लुकोमीटर तपासणी केली जात आहे. साथरोग सर्वेक्षणातून ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, श्‍वसनास त्रास, धाप लागणे, शुगर, रक्‍तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण आदी लक्षणे असलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. 

एक महिन्यापूर्वी थर्मल स्क्रिनिंगद्वारे सर्व नागरिकांची तपासणी करण्यात आली. अन्य गावातून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढल्याने प्रतिबंधात्मक उपायकरिता सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार शहरात पुन्हा एकदा ग्लुकोमीटरद्वारे रक्तातील साखर व ऑक्‍सिमीटरद्वारे ऑक्‍सिजनचे प्रमाण तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू केले. रेड झोनमधून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करणे व शहरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यावर भर देत आहे. 

शहरात नगरपालिका कर्मचारी, शिक्षण मंडळाच्या शिक्षिका तसेच अंगणवाडी सेविकांच्या मदतीने सर्वेक्षण सुरू आहे. थर्मल स्क्रिनिंगद्वारे तापमान तपासणी करून जास्त तापमानाची नोंद झालेल्या नागरिकांना ग्रामीण रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येते. 
आता रक्तातील साखरेचे व ऑक्‍सिजनचे प्रमाण तपासण्याची विशेष मोहीम सुरू झाली आहे. यात ऑक्‍सिमीटरद्वारे रक्‍तातील ऑक्‍सिजनचे प्रमाण तपासण्याचे काम केले जाते. कोरोना आजारात श्‍वसनास त्रास झाल्यास ऑक्‍सिजनच्या प्रमाणातील बदल तपासणीत स्पष्ट होतो. 50 ते 55 वर्षांच्या नागरिकांची जागेवरच मधुमेह तपासणी करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले. 

नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी 
शासनाने काही प्रमाणात उद्योग, व्यापार व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे, सतत हात धुणे अशा सवयी लावून घ्याव्यात. अन्य ठिकाणांवरून आलेल्या नागरिकांची माहिती द्यावी. . 
-अरुणा माळी, नगराध्यक्षा, मंगळवेढा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT