Murder 
सोलापूर

बापरे..! संजय काळे खुनाच्या कटात मुलासह पत्नीचाही सहभाग; केली पोलिस कोठडीत रवानगी 

संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील शिराळ (टें) येथील संजय मारुती काळे (वय 55) याच्या खुनाच्या कटामध्ये मृत संजय काळे याची पत्नी अंजना संजय काळे (वय 45) ही देखील सहभागी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. शनिवारी सायंकाळी टेंभुर्णी पोलिसांनी तिला अटक करून माढा न्यायालयासमोर हजर केले असता, तिला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश माढ्याचे न्यायदंडाधिकारी यांनी दिल्याची माहिती टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी यापूर्वी संजय काळे याचा मुलगा आकाश काळे त्याचे सहकारी लक्ष्मण बंदपट्टे, अल्लाऊद्दीन ऊर्फ आलम बासू मुलाणी या तिघांना अटक केली आहे. 

पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले, की संजय काळे यांचे चारित्र्य वादग्रस्त होते व तो नेहमी घालून-पाडून बोलत होता. त्यामुळे पत्नी अंजना काळे व मुलगा आकाश काळे या दोघांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी संजय काळे याचा खून करण्याचा कट रचला होता. तो तडीस नेण्यासाठी पत्नी अंजना काळे हिने घटनेच्या आदल्या दिवशी कपाटातून दहा हजार रुपये काढून मुलगा आकाश काळे याला दिले होते. आकाशने सराईत गुन्हेगार लक्ष्मण रघुनाथ बंदपट्टे, अल्लाऊद्दीन ऊर्फ आलम बासू मुलाणी या साथीदारांशी संगनमत करून वडील संजय काळे याच्या खुनाचा कट रचला. खून करण्यासाठी लक्ष्मण बंदपट्टे यास अंजना काळे यांनी दिलेल्या पैशातून रोख सात हजार रुपये दिले. यानंतर शनिवारी (25 जुलै) रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास या तिघांनी घरी येऊन अंगणामध्ये झोपलेल्या संजय काळे याचा तलवार व कोयत्याने तोंडावर व गळ्यावर वार करून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी टेम्पोखाली त्याचा मृतदेह टाकून टेम्पो जाळला होता. 

चौकशीमध्ये आकाश काळे याने खून केल्याची कबुली दिल्यानंतर लक्ष्मण बंदपट्टे व अल्लाऊद्दीन ऊर्फ आलम मुलाणी यांना अटक केली. पोलिसांनी संशयित आरोपींकडे केलेल्या चौकशीमध्ये संजय काळे याची पत्नी अंजना काळे ही देखील या खुनामध्ये सहभागी असल्याचे समोर आले. त्यामुळे अंजना काळे हिला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने खुनाच्या वेळी हजर असल्याचे सांगून कटामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली, असे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT